घरक्रीडाIND vs ENG : भारतासाठी 'करो या मरो'; इंग्लंडविरुद्ध चौथा टी-२० सामना...

IND vs ENG : भारतासाठी ‘करो या मरो’; इंग्लंडविरुद्ध चौथा टी-२० सामना आज

Subscribe

भारताला या मालिकेत आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी चौथा टी-२० सामना जिंकणे अनिवार्य आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना गुरुवारी खेळला जाणार आहे. इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत अप्रतिम खेळ केला. त्यांनी हा सामना जिंकत पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. त्यामुळे भारताला या मालिकेत आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी चौथा टी-२० सामना जिंकणे अनिवार्य आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौलही कोणाच्या बाजूने लागतो याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. पहिल्या तिन्ही सामन्यांत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि धावांचा यशस्वीरीत्या पाठलाग केला. मात्र, प्रथम गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, आम्ही चांगली कामगिरी करणे गरजेचे असल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला आहे.

कोहलीला सूर गवसला

तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने २० षटकांत ६ बाद १५६ अशी धावसंख्या उभारली आणि जॉस बटलरच्या अर्धशतकामुळे इंग्लंडने १५७ धावांचे लक्ष्य १० चेंडूत राखून गाठत सामना जिंकला. या सामन्यात भारताचे इतर फलंदाज अपयशी ठरत असताना कर्णधार कोहलीने एकाकी झुंज देत नाबाद ७७ धावांची खेळी केली. हे त्याचे सलग दुसरे अर्धशतक ठरले. त्यामुळे तो फॉर्मात आला ही भारतासाठी आनंदाची बाब आहे.

- Advertisement -

राहुल मालिकेत अपयशी

सलामीवीर लोकेश राहुल पुन्हा अपयशी ठरल्याने त्याच्यावरील दडपण वाढत आहे. गोलंदाजीत बदल होण्याची शक्यता असून राहुल आणि दीपक या चहर बंधूंना संधी मिळू शकेल. या मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांत मिळून राहुलने केवळ १ धाव (१,०,०) केली आहे. परंतु, तिसऱ्या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी राहुलची पाठराखण केल्याने तो संघात कायम राहण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत बदल होण्याची शक्यता असून राहुल आणि दीपक या चहर बंधूंना संधी मिळू शकेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -