India vs England Test : भारतासमोर जिंकण्यासाठी १९४ धावांचे लक्ष!

इंग्लंडने भारतासमोर १९४ धावांचे लक्ष ठेवले असून इंग्लंडचे ६ गडी झटपट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या डावाला आदिल रशीद आणि सॅम कुर्रान यांनी सावरत अर्धशतकी भागीदारी केली आहे. भारताकडून इशांतने अप्रतिम बॉलिंग करत तब्बल ५ विकेट्स घेतल्या आहेत.

india vs england 1st test
भारतविरूद्ध इंग्लंड टेस्ट

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात इंग्लंडच्या २८७ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव सर्वबाद २७४ धावात आटोपला. यानंतर इंग्लंडने पुन्हा खेळताना भारतासमोर १९४ धावांचे लक्ष ठेवले आहे. इंग्लंडचे ६ गडी झटपट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या डावाला आदिल रशीद आणि सॅम कुर्रान यांनी सावरत अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर उमेश यादवने रशीदला बाद करत ही भागीदारी तोडली. यानंतर अखेर ब्रॉड आणि कुर्रान यांनी अखेरपर्यंत खेळी केली. मात्र ब्रॉड आणि कुर्रान हे चार धावांच्या अंतरानी बाद झाल्यानंतर डावाच्या अखेरीस भारतासमोर १९४ धावांचे लक्ष इंग्लंडने ठेवले आहे. भारताकडून इशांतने अप्रतिम बॉलिंग करत ५ विकेट्स घेतल्या.

इशांतची अप्रतिम बॉलिंग

भारताकडून इशांतने अप्रतिम बॉलिंग करत तब्बल ५ विकेट्स घेतल्या. त्याने १३ ओव्हर टाकत ५१ धावा देत ५ विकेट्स आपल्या नावे केल्या. इशांतसोबतच आश्विनने ३ तर उमेश यादवने २ विकेट्स घेतल्या आहेत. उमेश यादवने सर्वात महत्त्वाची असा कुर्रानची विकेट आपल्या नावे केली. ज्यानंतर भारतासमोर १९४ धावांचे लक्ष आहे.

ishant sharma
इशांत शर्मा