घरक्रीडाIND vs ENG : 'कोणाला तरी संघाबाहेर बसावे लागणारच'; अश्विनबाबत माजी क्रिकेटपटूचे...

IND vs ENG : ‘कोणाला तरी संघाबाहेर बसावे लागणारच’; अश्विनबाबत माजी क्रिकेटपटूचे विधान

Subscribe

इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या तिन्ही सामन्यांत अश्विनला संधी मिळाली नाही.

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक मानला जातो. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७९ सामन्यांत ४१३ विकेट घेतल्या आहेत. मात्र, इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या तिन्ही सामन्यांत त्याला संधी मिळाली नाही. अश्विनला लॉर्ड्स येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीसाठी अंतिम ११ मध्ये स्थान मिळणार होते. परंतु, सामन्यापूर्वीच पाऊस झाल्याने त्याला संघाबाहेरच बसावे लागले. तसेच भारताने लॉर्ड्स कसोटी जिंकल्याने तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल करणे भारताने टाळले. त्यामुळे अश्विनला पुन्हा संधी मिळाली नाही. ‘एकावेळी संघामध्ये केवळ ११ खेळाडूच खेळू शकतात. त्यामुळे कोणाला तरी संघाबाहेर बसावे लागणारच,’ असे म्हणत दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने भारतीय संघाच्या निर्णयाचे समर्थन केले.

खेळाडू निवडण्याचा अधिकार कर्णधाराला

दोन कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघ मालिकेत १-० असा आघाडीवर आहे. त्यामुळे अश्विनला संधी मिळाली पाहिजे होती असे म्हणणे अवघड आहे. कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने केलेल्या संघनिवडीचे सर्वांनी समर्थन केले आहे. एकावेळी संघामध्ये केवळ ११ खेळाडूच खेळू शकतात आणि हे खेळाडू निवडण्याचा अधिकार कर्णधाराला असतो. मैदानात त्याला संघाचे नेतृत्व करायचे असते. त्यामुळे या ११ खेळाडूंना संधी दिल्यास आपल्याला २० विकेट घेण्याची सर्वोत्तम संधी आहे असे कर्णधाराला वाटले पाहिजे, असे ऱ्होड्स एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

- Advertisement -

अश्विनची कसोटी कारकीर्द संपली नाही

अश्विनने उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि त्याची कसोटी कारकीर्द संपली असे तर अजिबातच नाही. परंतु, कर्णधार म्हणून कोहलीला संघाची निवड करताना बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागत आहे. इंग्लंडमध्ये खेळताना संतुलित संघाची निवड करणे खूप अवघड असते. एकावेळी तुमचे केवळ ११ खेळाडूच मैदानात उतरू शकतात. त्यामुळे कोणाला तरी संघाबाहेर बसावे लागणारच, असेही ऱ्होड्सने सांगितले.


हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : ‘Jarvo 69’ पुन्हा घुसला मैदानात

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -