घरक्रीडाभारत-इंग्लंड वनडे, टी-२० मालिका लांबणीवर?

भारत-इंग्लंड वनडे, टी-२० मालिका लांबणीवर?

Subscribe

बीसीसीआयने याबाबत अजून कोणतीही घोषणा केली नसली तरी लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे.

इयॉन मॉर्गनचा इंग्लंड संघ सप्टेंबरमध्ये सहा सामन्यांची मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार होता. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि इंग्लंडमधील मालिका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात न्यूझीलंड ‘अ’ संघ भारताच्या दौऱ्यावर येणार होता, पण आता हा दौराही पुढे ढकलण्यात येणार हे जवळपास निश्चित आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत अजून कोणतीही घोषणा केली नसली तरी लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ कौन्सिलची शुक्रवारी बैठक

इंग्लंड संघ सप्टेंबरच्या अखेरीस भारतात येऊन भारताविरुद्ध सहा मर्यादित षटकांचे (तीन एकदिवसीय आणि तीन टी-२०) सामने खेळणार होता. परंतु, सध्याच्या परिस्थितीत इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार नाही हे जवळपास निश्चित आहे, असे बीसीसीआयचा सिनियर अधिकारी म्हणाला. बीसीसीआयच्या वरिष्ठ कौन्सिलची शुक्रवारी बैठक होणार असून यात भारतीय संघाच्या पुढील वेळापत्रकाबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

त्यानंतरच अधिकृत घोषणा

शुक्रवारी होणाऱ्या बीसीसीआयच्या वरिष्ठ कौन्सिलच्या बैठकीत भारताच्या पुढील वेळापत्रकाबाबत नक्कीच चर्चा होईल आणि त्यानंतरच इंग्लंडच्या भारत दौऱ्याबाबतची अधिकृत घोषणा होईल. न्यूझीलंड ‘अ’ संघ ऑगस्टमध्ये भारतात येणार होता, पण आता हा दौराही पुढे ढकलण्यात येणार आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यास भारताच्या खेळाडूंचे ऑगस्टमध्ये शिबीर होऊ शकेल असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले. त्यामुळे साहजिकच इतक्यातच कोणतेही सामने होऊ शकत नाहीत, असेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -