घर क्रीडा India vs Ireland 1st T20 : अनुभवी नव्हे तर नवख्यांच्या साथीने जसप्रीत...

India vs Ireland 1st T20 : अनुभवी नव्हे तर नवख्यांच्या साथीने जसप्रीत बुमराह करणार आयर्लंडशी दोन हात

Subscribe

आजपासून भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तर या मालिकेसाठी अनुभवी खेळाडूंना आराम देण्यात आला असून, त्यांच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजसोबतच्या टी-20 मालिकेत 3-2 ने पराभव झालेला भारतीय संघ आता आयर्लंडशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयर्लंडशी होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणासुद्धा करण्यात आली असून, यामध्ये अनुभवी खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. तर नवख्या खेळाडूंचे नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे देण्यात आले आहे. तेव्हा या संघात कोणाला संधी मिळाली ते पाहूया.(India vs Ireland 1st T20 Jasprit Bumrah will play a two-hander against Ireland with not experienced but new players)

आजपासून भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तर या मालिकेसाठी अनुभवी खेळाडूंना आराम देण्यात आला असून, त्यांच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजसोबतच्या मालिकेत रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल आणि जितेश शर्मा यांनी चांगली कामगिरी केली होती. या कामगिरीच्या बळावरच त्यांना आता आयर्लंडसोबत होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आले आहे.

रिंकू सिंह प्लेईंग इलेव्हनमध्ये?

- Advertisement -

नवखा खेळाडू असलेल्या रिंकू सिंहला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. आयर्लंडशी होणाऱ्या टी-20 मालिकेत त्याला पदार्पणाची संधी देण्यात येऊ शकते. कारण, त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर टीम इंडियासोबतच्या सरावा दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये तो भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसत आहे आणि त्याच्या हातात बॅट आहे. तेव्हा रिंकू सिंह या मालिकेत पदार्पण करतो की, नाही हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा : कोकणच्या जलकन्येची देशपातळीवर भरारी; आता गाजवणार राष्ट्रीय स्पर्धा

असा आहे नवखा संभाव्य भारतीय संघ

- Advertisement -

आयर्लंडशी होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचा प्लेईंग 11 चा संभाव्य संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार यांचा समावेश आहे.

हेही वाचा : अयोध्येत प्रभूरामाला फूलमाळा घालण्यास भाविकांना मनाई? सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी

आयर्लंडसोबतच्या मालिकेतील असे होणार सामने

भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत आणि आयर्लंड टी-20 मालिका शुक्रवारपासून सुरु होत आहे. 18 ऑगस्ट रोजी डबलिन येथे पहिला टी20 सामना खेळवण्यात येणार आहे. 20 ऑगस्ट रोजी दुसरा आणि 23 ऑगस्ट रोजी तिसरा टी20 सामना रंगणार आहे.

- Advertisment -