टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड; ऑस्ट्रेलियाला टाकले मागे

भारत आणि आयर्लंड (India Vs Ireland) यांच्यातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) केला आहे.

भारत आणि आयर्लंड (India Vs Ireland) यांच्यातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय मिळवण्याचा रेकॉर्ड भारती नोंद ठरली आहे. या रेकॉर्डमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. (India Vs Ireland 1st T20 Team India Creates World Record Of Most Wins While Chasing)

भारतीय संघाचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने चांगली कामगिरी करत आयर्लंडचा पराभव केला. पहिल्याच टी-२० सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा १६ चेंडू आणि ७ विकेट शिल्लक ठेवून पराभव केला. या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने हा सामना १२-१२ षटकाचा खेळवण्यात आला.

दरम्यान, भारतीय संघाने क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या नावावर सर्वाधिक आव्हानात्मक सामने जिकण्याच्या विक्रमाची नोंद झाली आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. ऑस्ट्रेलिया संघाने टी-२० क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना ९४ सामने खेळले असून, यामधील ५४ सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला होता. तसेच, ३७ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.

भारतीय संघाने आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडविरुद्ध ७५ वा सामना खेळला असून यातला ५५ वा सामना जिंकण्यात त्यांना यश आले आहे तसेच, १९ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला.

रविवारी झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडवर ७ गडी आणि १६ चेंडू राखून मात केली. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर आयर्लंडने ४ बाद १०८ अशी धावसंख्या उभारली. त्यानंतर आज भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा सामना होणार आहे. यासामन्यात कोणत्या खेळाडूला संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – इंग्लंडच्या ‘हा’ दिग्गद खेळाडू लवकरच घेणार निवृत्ती