घर क्रीडा India vs Ireland 2nd T20 : भारताने आयर्लंडचा केला दारुण पराभव; बुमराहच्या...

India vs Ireland 2nd T20 : भारताने आयर्लंडचा केला दारुण पराभव; बुमराहच्या नेतृत्वाखाली पहिली मालिका जिंकली

Subscribe

India vs Ireland 2nd T20 : आयर्लंड (Ireland) येथे सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील (India vs Ireland 2nd T20) दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने (India) प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या (Rituraj Gaikwad) अर्धशतकाच्या जोरावर निर्धारीत 20 षटकात 5 विकेट गमावून 185 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून आयर्लंडच्या अँड्र्यू बालबर्नीच्या (Andrew Balberney) शानदार अर्धशतकानंतरही संघाला निर्धारित 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 152 धावा करता आल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा (prasidh krishna) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) यांनी 2-2 विकेट घेतल्या. त्यामुळे भारतीय संघाने 33 धावांनी आयर्लंड संघाचा पराभव करत कर्णधार जयप्रती बुमराहच्या नेतृत्वाखाली पहिली मालिका जिंकली आहे. (India vs Ireland 2nd T20 India beat Ireland badly First series won under Bumrahs leadership)

हेही वाचा – Asia cup 2023 : आशिया चषकासाठी भारतीय संघाची आज होणार घोषणा; 15 खेळाडूंमध्ये कोणाला मिळणार संधी?

- Advertisement -

भारताकडून मिळालेल्या 186 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. आयर्लंड संघाने 19 धावांवर आपल्या दोन विकेट गमावल्या. कर्णधार पॉल स्टर्लिंग खाते न उघडताच माघारी परतला. त्याच षटकात प्रसिद्ध कृष्णाने लार्कन टकरलाही बाद केले. हॅरी टेक्टर 7 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. रवी बिश्नोईने त्याला त्रिफळाचीत केले. यानंतर कॅम्पर आणि अँड्र्यू बालबर्नी यांच्यात भागीदारी झाली. पण कॅम्पर 17 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. त्यानंतर डॉकरेल 13 धावांवर धावबाद झाला. अँड्र्यू बालबर्नी 51 चेंडूंत 72 धावांची शानदार खेळी केली पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

- Advertisement -

दरम्यान, नाणेफेक जिंकून भारतीय संघाने चांगली सुरूवात केली. यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी पहिल्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी केली. यशस्वी जयस्वाल 11 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. टिळल वर्मा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. त्याला केवळ एक धाव करता आली. यानंतर संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. संजू सॅमसन 26 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडही 39 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक केल्यानंतर 58 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तो बाद झाला. यानंतर शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांनी अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. रिंकू सिंग 21 चेंडूत 38 धावा करून बाद झाला तर, शिवम दुबे 16 चेंडूत 22 धावा करून नाबाद राहिला.

हेही वाचा – Vande Bharat Express: भगव्या रंगातील वंदे भारत एक्स्प्रेस पाहिली का?

दरम्यान, पहिल्या सामन्यात आयर्लंडने संघाने 7 विकेट्सच्या मोबदल्यात 139 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 6.5 षटकांत 2 बाद 47 धावा केल्या, मात्र अचानक पावसाला सुरूवात झाली आणि पुढील खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे भारतीय संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावांनी विजयी करण्यात आले होते.

- Advertisment -