घरक्रीडाIND vs NZ 1st Test : भारतीय संघ विजयापासून वंचित; न्यूझीलंडने शेवटच्या...

IND vs NZ 1st Test : भारतीय संघ विजयापासून वंचित; न्यूझीलंडने शेवटच्या षटकांत सावध खेळी करून सामना केला ड्रॉ

Subscribe

भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेला कानपूर मधील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला आहे

भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेला कानपूर मधील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. शेवटच्या काही षटकांत भारतीय संघाला विजयासाठी १ बळी घेण्याची आवश्यकता होती. मात्र बळी घेण्यात अपयशी ठरल्याने पाचव्या दिवसाअखेर सामना बरोबरीचा घोषित करण्यात आला. लक्षणीय बाब म्हणजे खराब प्रकाशामुळे ११ मिनिटे अगोदरच पाचव्या दिवसाचा खेळ संपवण्यात आला. भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाला २८४ धावांचे तगडे आव्हान दिले होते. पण शेवटच्या दोन सत्रात भारतीय फिरकीपटूंच्या समोर न्यूझीलंडच्या संघाने सावध खेळी करून भारतीय संघाला विजयापासून वंचित ठेवले. भारतीय संघाला शेवटच्या षटकांत विजयासाठी एक बळी घेण्याची आवश्यकता असताना न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि एजाज पटेलने सावध खेळी करून भारतीय गोलंदाजांना बळी घेण्यासाठी तरसवत ठेवले.

कानपूर मधील कसोटी सामन्याचा काही मिनिटांचाच खेळ राहिला होता. मात्र मैदानात अंधाराचे सावट पसरत होते. पंचानी दोन-तीन वेळा प्रकाशाबाबत चर्चा देखील केली. फक्त ४ षटकांचा खेळ राहिला असताना न्यूझीलंडने सावध खेळी करून सामन्यात बरोबरी साधली.

- Advertisement -

पाचव्या दिवशी देखील भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली होती. पाचव्या दिवसाच्या सुरूवातीपासूनच भारतीय संघाने न्यूझीलंडवर दबाव राखून ठेवला होता. पाचव्या दिवसाअखेर न्यूझीलंडच्या संघाची धावसंख्या ९ बाद १६५ एवढी राहिली. दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ बळी पटकावले. तर रवीचंद्रन अश्विनने ३ बळी घेतले. याव्यतिरिक्त अक्षर पटेल आणि उमेश यादवला प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.

- Advertisement -

न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तर सोमरविलेने ३६ धावा केल्या. सोमवरविले आणि लॅथमला वगळले तर कोणत्याच न्यूझीलंडच्या फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. मात्र शेवटच्या काही षटकांत न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि एजाज पटेलने सावध खेळी करून न्यूझीलंडला पराभवापासून वाचवले. बदल्यात पाचव्या दिवसाअखेर सामना बरोबरीचा घोषित करण्यात आला.


हे ही वाचा: http://PAK vs BAN : पाकिस्तानच्या संघाला मोठा झटका; कोरोनामुळे अर्ध्यातूनच दौरा सोडणार हा दिगग्ज


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -