घरक्रीडान्यूझीलंडने भारताचे कंबरडे मोडले; ८ विकेट्सनी भारताचा दणदणीत पराभव

न्यूझीलंडने भारताचे कंबरडे मोडले; ८ विकेट्सनी भारताचा दणदणीत पराभव

Subscribe

न्यूझीलंडने भारताचे कंबरडे मोडले आहे. अवघ्या ९२ धावांमध्ये भारतीय संघ ऑल आऊट झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंडसमोर फक्त ९३ धावांचे लक्ष्य आहे.

सलग ३ सामने जिंकल्यानंतर बिनधास्त असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला चौथ्या वनडे सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आज हॅमिल्टन येथे भारत विरिद्ध न्यूझीलंडचा चौथा वनडे सामना सुरु झाला. या वनडे सामन्यात भारताची सुरुवात हवी तशी झालेली नाही. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकूण गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ फलंदाजी करत होता. परंतु, भारतीय क्रिकेट संघ अवघ्या १०० धावा देखील करु शकला नाही. अवघ्या ९२ धावा करुन भाराताचे सर्व फलंदाज माघारी फिरले. भारताकडे तगड्या फलंदाजांची फळी असतानाही अवघ्या ९२ धावांवर ऑल आऊट होणे म्हणजे भारताची नाचक्की होण्यासारखेच आहे.

- Advertisement -

रोहित शर्माच्या नेतृत्त्वातला खेळ

आजचा सामना हा रोहित शर्माच्या आयुष्यातील अविस्मरणीय सामना असणार आहे. कारण, आजचा सामना हा रोहित शर्माच्या कारकिर्दितला २०० वा वनडे सामना आहे. दरम्यान, बीसीसीआयने विराट कोहलीला या सामन्यासाठी विश्रांती दिली आहे आणि आजच्या सामन्याचे नेतृत्त्व रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आले होते. रोहित शर्माच्या चाहत्यांना त्याच्यापासून फार अपेक्षा होत्या. परंतु, आजच्या सामन्याची सुरुवात हवी तशी झाली नाही आणि पूर्ण डावच फसला. सुरुवातीपासूनच भारतीय क्रिकेट संघाच्या भोवती पराभवाचे काळे ढग दाटताना दिसत होत्या. अवघ्या ९२ धावांमध्ये भारताने आपला खेळ आवरता घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सहजच ९३ धावा केल्या आणि विजयाचा झेंडा फडकवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -