IND vs NZ : नवा सामना नवा कर्णधार ! न्यूझीलंडच्या प्रत्येक टी-२० मध्ये नवा कर्णधार; साउदी नंतर कोण ?

शुक्रवारी होणाऱ्या पुढील सामन्यात कर्णधारपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे

न्यूझीलंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आला आहे. भारत आणि न्यूझीलंडच्या दोन्ही संघामध्ये टी-२० चा पहिला सामना बुधवारी जयपुरमध्ये पार पडला. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ५ गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार केन विलियमसन भारताविरूध्दच्या मालिकेचा हिस्सा नसणार आहे, त्याला विश्रांती देण्यात आली आहे. अशातच विलियमसनच्या जागेवर न्यूझीलंडची संघ निवड समितीने प्रत्येक सामन्यात नवा कर्णधार बनवण्याचा प्रयोग सुरू करत आहे. संघ निवड समिती प्रत्येक टी-२० सामन्यात रोटेशन पध्दतीने कर्णधार बदलणार आहे. त्यामुळे पहिल्या टी-२० सामन्यात टिम साउदीकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र आता शुक्रवारी होणाऱ्या पुढील सामन्यात कर्णधारपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दुसऱ्या सामन्यात सँटनर किंवा बोल्ट कर्णधार?

भारत आणि न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या टी-२० मालिकेचा दुसरा सामना १९ नोव्हेंबरला रांची येथे होणार आहे. पहिल्या सामन्यात टिम साउदीच्या नेतृत्वात खेळलेल्या न्यूझीलंडच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच पुढील सामन्यात अष्टपैलू मिचेल सेंटनर किंवा वेगवान गोलंदाज ट्रेंन्ट बोल्टची कर्णधारपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. अशा पध्दतीने तिसऱ्या सामन्यात देखील कर्णधार पदाची रोटेशन पध्दत चालू राहणार आहे.

न्यूझीलंडकडून प्रत्येक सामन्यात कर्णधारपद बदलण्याचा मुख्य हेतू म्हणजे खेळांडूना विश्रांती मिळावी हा आहे. कारण न्यूझीलंडचा संघ विश्वचषकातील अंतिम सामना खेळून भारताच्या दौऱ्यावर आला आहे त्यामुळे खेळांडूना पुरेसा आराम मिळाला नाही. कसोटी मालिका डोळ्यासमोर ठेवून सर्वांना समान विश्रांती देणे गरजेचे आहे. प्रशिक्षक गॅरी स्टीड यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्या खेळाडूला आराम देण्याची गरज आहे यावर ते २४ तासांपूर्वीच निर्णय घेतात. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ कसोटी मालिका डोळ्यासमोर ठेवून असा प्रयोग करत आहे. त्यांनी आणखी सांगितले की न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकानंतर लगेचच कोणती मालिका खेळत आहे.


हे ही वाचा: लैंगिक अत्याचारानंतर पेंग शुईचा ईमेल सुरक्षेबद्दल चिंता वाढवतो, WTA प्रमुख स्टीव्ह सायमन यांची प्रतिक्रिया