घरICC WC 2023IND vs NZ : विराटच्या शतकी खेळीनंतर पत्नी अनुष्काच्या डोळ्यात आनंदाश्रू; फ्लाइंग...

IND vs NZ : विराटच्या शतकी खेळीनंतर पत्नी अनुष्काच्या डोळ्यात आनंदाश्रू; फ्लाइंग किस देताना झाली भावूक

Subscribe

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि रनमशीन विराट कोहली याने अनेक विक्रम मोडले आहेत. मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा विश्वविक्रम विराट कोहली याने मोडला आहे. विराटच्या या शतकी खेळीनंतर त्याचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि रनमशीन विराट कोहली याने अनेक विक्रम मोडले आहेत. मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा विश्वविक्रम विराट कोहली याने मोडला आहे. विराटच्या या शतकी खेळीनंतर त्याचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले. परंतु, विराटचा हा सामना पाहाण्यासाठी त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सुद्धा स्टेडीअममध्ये उपस्थित असून, विराटच्या या खेळीनंतर अनुष्का शर्माच्या डोळ्यात आनंदाश्रृ पाहायला मिळाले. (India vs new zealand virat kohli 50 century in Odi World cup cry anushka sharma)

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात विराट कोहलीने वर्ल्डकपच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वनडे क्रिकेटमधील 50 वे शतक झळकावले. या ऐतिहासिक खेळीसह विराट अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याच्या चेंडूवर दोन धावा काढत विराट कोहलीने आपले शतक पूर्ण केले. या शतकी खेळीनंतर मैदानात टाळ्यांच्या कडकडाट पाहायला मिळाला.

- Advertisement -

विराटच्या विक्रमी खेळीनंतर वानखेडे स्टेडियममधील सर्व चाहत्यांनी उभं राहत विराटच्या या खेळीचे स्वागत केले. शिवाय, विराटनेही मैदानातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना अभिवादन केलं. तसेच, पत्नी अनुष्का शर्माला एक प्रेमळ फ्लाइंग किस दिला. यानंतर अनुष्कानेही आपल्या पतीच्या प्रेमळ फ्लाइंग किसला फ्लाइंग किसनेच रिप्लाय दिला. तसेच, विराटच्या या खेळीचे जल्लोषात स्वागत केले. विराट आणि अनुष्काचा हा फ्लाइंग किसचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Most Sixes : वर्ल्डकपमध्ये रोहितची षटकारांची ‘फिफ्टी’; युनिवर्स बॉस मोडला विक्रम

- Advertisement -

या सामन्यात विराट कोहली 113 चेंडूत 117 धावा करत बाद झाला. विराटने या शतकी खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या वनडे वर्ल्डकपच्या पहिल्या उपांत्य फेरीत नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 8.2 षटकात 71 धावा जोडल्या. रोहित शर्मा 29 चेंडूत 47 धावा करून टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर शुभमन गिल 65 चेंडूत 79 धावा करून दुखापतग्रस्त झाला. विराट कोहलीने 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली. यानंतर श्रेयस अय्यरने शानदार शतक झळकावले. श्रेयस अय्यरने अवघ्या 67 चेंडूत शतकाचा टप्पा गाठला.


हेही वाचा – रनमशीन विराट कोहलीचे वर्ल्डकपमध्ये शतकांचं अर्धशतक; सचिन तेंडुलकरचा मोडला विश्वविक्रम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -