नवी दिल्ली : सध्या आशिया चषक सुरू असून, काल झालेल्या भारत-पाक सामन्यांता भारताने पाकिस्तानला तब्बल 228 धावांनी पराभूत केले. यानंतर पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमींनी आपले दुःख व्यक्त केले. यादरम्यानच एका क्रिकेटप्रेमीने भारत पाकिस्तानमध्ये खेळण्यास येत नसल्याच्या कारणावरून आपला संताप व्यक्त केला आहे. सध्या त्याची प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल होत आहे.(India VS Pakistan Are we sitting with bombs? Pakistani cricket fans expressed their anger)
सध्या आशिया चषक ही स्पर्धा खेळली जात आहे, ज्यामध्ये 11 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानच्या दारूण पराभवानंतर, पाकिस्तानी यूट्यूबर शोएब चौधरीने लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. पाकिस्तानी संघाच्या पराभवामुळे सीमेपलीकडील लोकांमध्ये असलेला संताप स्पष्ट दिसत होता, ते भारताकडून झालेल्या पराभवामुळे संतापलेले दिसत होते.
पाकिस्तानात न जाण्यावरून काय म्हणाला क्रिकेटप्रेमी
भारतीय संघ पाकिस्तानात न येण्यावर एका पाकिस्तानी व्यक्तीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी व्यक्तीने सांगितले की, भारतीय संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला घाबरतो. त्यांनी इथे येऊन क्रिकेट खेळावे, आम्ही का बॉम्ब घेऊनच बसलो आहोत का, की ज्यामुळे ते पाकिस्तानात येऊ इच्छित नाहीत?. असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.
हेही वाचा : IND Vs PAK: भारताचा दणदणीत विजय; पाकिस्तानचा तब्बल 228 धावांनी उडवला धुव्वा
आशिया चषक पाकिस्तानात पण सामने श्रीलंकेत
सुरु असलेला आशिया चषक हा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र, भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारताचे सामने हे श्रीलंकेत होत आहेत. मागील 4 ते 5 वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध चांगले नाहीत, त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तानमध्ये सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत.
हेही वाचा : IND vs PAK : भारतीय फलंदाजांनी पाक गोलंदाजांची पिसे काढली; विराट-राहुलची दमदार शतके
15 वर्षांपासून पाकिस्तानमध्ये नाही गेला संघ
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडल्याने भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये खेळणे बंद केले होते. भारतीय क्रिकेट संघाने 2008 मध्ये आशिया चषकादरम्यान पाकिस्तानचा शेवटचा दौरा केला होता. त्यानंतर भारतीय संघ गेल्या 15 वर्षांत एकदाही पाकिस्तानात गेला नाही. पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. 2009 मध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर अनेक वर्षे पाकिस्तानमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही.