Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यात आज होणार क्रिकेट युद्ध; 17व्यांदा येणार...

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यात आज होणार क्रिकेट युद्ध; 17व्यांदा येणार आमनेसामने

Subscribe

आशिया चषकातील महामुकाबला म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना आज (2 सप्टेंबर) होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा सामना सुरु होण्यासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील सामना श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

आशिया चषकातील महामुकाबला म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना आज (2 सप्टेंबर) होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा सामना सुरु होण्यासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील सामना श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 17व्यांदा आमनेसामने येणार आहेत. (india vs pakistan asia cup 2023 date time venue squad know statistics of india pakistan match)

आशिया चषकाच्या मागील 15 हंगामात दोन्ही संघ T20 आणि वनडे फॉरमॅटसह एकूण 16 वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या 16 सामन्यांपैकी एका सामन्याचा (1997) निकाल लागला नाही. उर्वरित 15 सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

- Advertisement -

1984 ते 2018 दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये एकूण 13 सामने खेळवण्यात आले, ज्यामध्ये भारताने सात वेळा पाकिस्तानला पराभूत केले आहे. त्याचवेळी पाकिस्तानने 5 वेळा विजयाची नोंद केली, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

भारतीय संघाने 1984, 1988, 2008, 2010, 2012 आणि 2018 मध्ये दोन वेळा पाकिस्तानला पराभूत केले. तर दुसरीकडे, 1995 साली शारजाच्या मैदानावर झालेल्या आशिया चषकात भारताविरुद्धचा पहिला सामना पाकिस्तानने जिंकला होता. यानंतर 2000, 2004, 2008 आणि 2014 मध्येही पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता.

- Advertisement -

आशिया चषकात T20 फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान फक्त तीन वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात भारताने विजय मिळवला तर एका सामन्यात पाकिस्तानने विजयाची नोंद केली. 2016 मध्ये भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला होता. तर 2022 मध्ये भारताने ग्रुप स्टेजमध्ये तर सुपर-4 मध्ये पाकिस्तानने बाजी मारली होती.

भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

पाकिस्तानचा संभाव्य संघ : बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, हरिस रौफ , नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.


हेही वाचा – Ind vs Pak : भारताविरुद्ध हरलो तरी चालेल, पण…; पाकिस्तानच्या माजी अष्टपैलूने बाबरला दिला खास सल्ला

- Advertisment -