घर क्रीडा IND vs PAK : कोलंबोमध्ये भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान; आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये...

IND vs PAK : कोलंबोमध्ये भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान; आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये होणार सामना

Subscribe

आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज ( रविवारी 10 सप्टेंबर) सामना होणार आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. या स्टेडियममध्ये 2004 नंतर प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यात वनडे सामना होणार आहे.

आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (रविवारी 10 सप्टेंबर) सामना होणार आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. या स्टेडियममध्ये 2004 नंतर प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यात वनडे सामना होणार आहे. गेल्या वेळी येथे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळले होते तेव्हा आशिया चषक स्पर्धेतच पाकिस्तानने 59 धावांनी विजय मिळवला होता. त्यावेळी भारताचा कर्णधार सौरव गांगुली आणि पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम उल-हक होता. मात्र 1994 मधील एक सामना अनिर्णित राहिला होता. (India vs Pakistan Cricket Match In Asia Cup 2023 VVP96)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या स्पर्धेतील हा दुसरा सामना असणार आहे. याआधी 2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. परंतु, गट फेरीतील हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्या सामन्यात भारतीय संघाला फलंदाजीची संधी मिळाली, पण पाकिस्तानी फलंदाज क्रीझवरही येऊ शकले नाहीत. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

पाकिस्तान संघ सुपर-4 मध्ये एक सामना खेळला आहे. बुधवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला. त्यामुळे आता सलग दुसऱ्या विजयावर पाकिस्तानची नजर असेल. त्याचबरोबर सुपर-4 मधील भारतीय संघाचा हा पहिलाच सामना असेल.

सामना कधी सुरू होईल? आणि कुठे पाहावा?

- Advertisement -

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सुपर-4 सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सुपर-4 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी अडीच वाजता टॉस होईल.


हेही वाचा – भारत – पाकिस्तान यांच्यात लवकरच क्रिकेट सामने? पाक दौऱ्यावरून परतलेल्या BCCI अध्यक्षांना विश्वास

- Advertisment -