घर क्रीडा India VS Pakistan : काही वेळातच सुरू होणार हायव्होल्टेज ड्रामा; खेळाडूंच्या कामगिरीकडे...

India VS Pakistan : काही वेळातच सुरू होणार हायव्होल्टेज ड्रामा; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Subscribe

आशिया चषकात एकमेकांशी भिडलेल्या भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यांवर पावसाचे संकट ओढवले होते. त्यानंतर याच चषकातील आता सूपर 4 चे सामने सुरू झाले आहेत.

नवी दिल्ली : प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या भारत आणि पाकिस्तान या संघामध्ये दुपारी तीन वाजता आशिया चषकातील साखळी फेरीतील सामना सुरू होणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले असून, या सामन्यात पाकिस्तानच्या 2 तर भारताच्या 3 खेळाडूंची कामगिरी महत्वपूर्ण ठरणार आहे. या खेळाडूंच्या कामगिरीकडे दोन्ही देशांचे लक्ष लागले आहे. (India VS Pakistan: High Voltage Drama to Begin Soon; Focus on player performance)

आशिया चषकात एकमेकांशी भिडलेल्या भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यांवर पावसाचे संकट ओढवले होते. त्यानंतर याच चषकातील आता सूपर 4 चे सामने सुरू झाले असून, या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा एकमेकांशी भिडत असून, या सामन्यांमध्ये भारताला पाकिस्तानला नमवावेच लागणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघामध्ये होऊ घातलेल्या विश्वचषकातही सामना रंगतदार होणार आहे. त्यापूर्वीच आता आशिया चषकात हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडत आहे. त्यामुळे दोघांमधील लढत पाहण्यासाठी चाहत्यांचा उत्साह वाढलेला असतो. भारतीय संघ चार वर्षानंतर पाकिस्तानविरोधात वनडेमध्ये दोन हात करत आहे. या सामन्यात कोणता खेळाडू चांगली कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

याआधीचा सामना करण्यात आला होता रद्द

- Advertisement -

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या स्पर्धेतील हा दुसरा सामना असणार आहे. याआधी 2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. परंतु, गट फेरीतील हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

हेही वाचा : भारत – पाकिस्तान यांच्यात लवकरच क्रिकेट सामने? पाक दौऱ्यावरून परतलेल्या BCCI अध्यक्षांना विश्वास

सुपर-4 मधील भारताचा पहिला सामना

- Advertisement -

पाकिस्तान संघ सुपर-4 मध्ये एक सामना खेळला आहे. बुधवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला. त्यामुळे आता सलग दुसऱ्या विजयावर पाकिस्तानची नजर असेल. त्याचबरोबर सुपर-4 मधील भारतीय संघाचा हा पहिलाच सामना असेल.

हेही वाचा : IND vs PAK : कोलंबोमध्ये भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान; आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये होणार सामना

भारतीय संघातील या खेळाडूंकडे लक्ष

भारतीय संघातील विराट कोहली याची कामगिरी पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत चांगली राहली आहे. तर आशिया चषकातील विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या पाकिस्तानविरोधातच आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही विराट कोहलीकडून मोट्या खेळीची आपेक्षा असेल. त्या पाठोपाठ रोहीत शर्मा आणि गोलंदाज जसप्रित बुमरहा याच्याही कामगिरीकडे लक्ष लागले आहे. तर पाकिस्तान संघातील बाबर आजम, शाहिन आफ्रिदी यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.

 

पाकिस्तानने नाणेफेक जिंकले

आज होत असलेल्या सामन्यांची नाणेफेक झाली आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असून, त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आता भारताला पाकिस्तानसमोर धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे.

 

- Advertisment -