आशिया चषक 2022 : भारतासमोर पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीचे आव्हान

आशिया चषक 2022 चा पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरूवात होणार असून, दुबईत होणार आहे. दुबईच्या ज्या स्टेडीयममध्ये हा सामना होणार आहे, त्यामध्ये भारताच्या कटू आठवणी आहेत.

आशिया चषक 2022 चा पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरूवात होणार असून, दुबईत होणार आहे. मात्र या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीचे मोठे आव्हान असणार आहे. कारण मागील टी-20 विश्वचशकात शाहिनने भारताचे तीन आघाडीचे फलंदाज बाद केले होते. (India vs pakistan match in dubai shaheen afridi virat kohli rohit sharma k l rahul)

पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने भारताच्या तीन मुख्य खेळाडूंना बाद केले होते. फलंदाज रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. त्यानंतर संघाला पुनरागमन करता आले नाही. आफ्रिदीने रोहित आणि राहुलला केवळ 2.1 षटकात 6 धावांवर बाद केले होते.

मागील टी-20 विश्वचषकात भारतीय खेळाडूंना शाहीन आफ्रिदीची गोलंदाजी महाग पडली होती. त्यानंतर पन्हा एकदा भारतासमोर आशिया चषकात शाहीन शाह आफ्रिदीचे मोठे आव्हान असणार आहे. मात्र भारताला विजयसाठी शाहीन आफ्रिदीला चोख प्रत्यत्तर द्यावे लागणार आहे. यासाठीच पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने शाहीन शाहचा कसा सामना करावा याबाबत आपले मत मांडले आहे.

दानिश कनेरिया याच्या माहितीनुसार, पॉवरप्लेमध्ये आफ्रिदीचा सर्वात धोकादायक चेंडू म्हणजे त्याची फुलर डिलिव्हरी. रोहित आणि विराटला शाहीन शाहला घाबरण्याची गरज नाही कारण दोघेही जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत. शाहीन ज्यावेळी गोलंदाजी करताना चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा रोहित आणि विराटला याची जाणीव असणे आवश्यक आहे. तसेच, त्यावेळी शरीराच्या जवळ खेळण्याचा प्रयत्न करावा. शिवाय, सूर्यकुमार यादव याचा स्क्वेअर लेगवर मारलेला फटका हा आफ्रिदीसमोर चांगला पर्याय ठरू शकतो.

दुबईच्या ज्या स्टेडीयममध्ये हा सामना होणार आहे, त्यामध्ये भारताच्या कटू आठवणी आहेत. याच स्टेडीयमवर गतवर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. तसेच, विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला होता.

आशिया कप 2022 साठी भारतीय क्रिकेट संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

बॅकअप खेळाडू – श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर.

आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ इली, फख्र जमां, हैदर अली, हैरिस रउफ, इफ्तिकार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जू., नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर.


हेही वाचा – Asia Cup 2022साठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी