भारत काही ‘तीस मार खां’ नाही, पुढच्या आठवड्यात परतणार; पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर बरळला

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानवर विजय मिळवला. विराट कोहलीच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हातातून निसटणारा सामना जिंकला. मात्र, या सामन्यातील पाकिस्तानच्या पराभवानंतर आजी-माजी पाकिस्तानी खेळाडूंना राग अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानवर विजय मिळवला. विराट कोहलीच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हातातून निसटणारा सामना जिंकला. मात्र, या सामन्यातील पाकच्या पराभवानंतर आजी-माजी पाकिस्तानी खेळाडूंना राग अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी त्याने “भारतीय संघ देखील ‘तीस मार खां’ नाही. भारतीय संघ पुढील आठवड्यात उपांत्य फेरी खेळून परत येईल”, असे म्हटले. (India vs Pakistan Shoaib Akhtar Talk On Indian Cricket Team and Pakistan Team)

शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना पाकिस्तानच्या पराभवाबाबत संताप व्यक्त केला आहे. तसेच, अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांने पाकिस्तानी खेळाडूंना चांगलेच सुनावलं आहे.

“हा पराभव खूप दुःखद आहे. तुम्हाला नाही तर आम्हाला मीडियाला सामोरे जावे लागते. भारतात बसावे लागेते. जगाला उत्तर द्यावे लागते. आता अशा कामगिरीनंतर काय उत्तरं देऊ? हे लज्जास्पद आणि निराशाजनक आहे. आता पाकिस्तानी म्हणत आहेत की दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंका”, असे शोएब अख्तरने म्हटले.

“मी आधीच सांगितले होते की या आठवड्यात पाकिस्तान परत येईल. पुढच्या आठवड्यात भारतही परतणार आहे. उपांत्य फेरी खेळून भारत परत येईल. तेही काही ‘तीस मार खां’ नाही. आम्ही तर बिलकुल नाही”, असेही शोएब म्हणाला.

“तुम्ही स्वतःला या परिस्थितीत का टाकले आहे? मला सध्या इतका राग येत आहे की तोंडातून काही निघून न जावं’, असं म्हणत शोएब अख्तरने त्याचा संताप व्यक्त केला”, असेही शोएब म्हणाला.

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तान संघाला एका धावेने पराभूत केले. पर्थमधील या पराभवानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर, आकिब जावेद, मोईन खान, वकार युनूस आणि मिसबाह-उल-हक यांच्यासह सर्वांमध्ये संताप आहे. या सर्वांनी आपला संताप व्यक्त केला आहे.


हेही वाचा – PAK vs ZIM : झिम्बाब्वेचे कमालीचे क्षेत्ररक्षण; 1 रनने मिळवला पाकिस्तानवर विजय