Eco friendly bappa Competition
घर क्रीडा India VS Pakistan : शोएब अख्तरची भविष्यवाणी, म्हणाला आगामी विश्वचषकात पाकिस्तान भारताला...

India VS Pakistan : शोएब अख्तरची भविष्यवाणी, म्हणाला आगामी विश्वचषकात पाकिस्तान भारताला हरवेल

Subscribe

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन संघ भिडण्यापूर्वी आशिया चषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे,

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातील प्रतिस्पर्धी संघ म्हणून ओळख असलेल्या भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हणजे दोन्ही देशातील क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असते. यंदा भारतातच विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यानंतर होऊ घातलेल्या या विश्वचषकात भारत-पाकिस्तान एकमेंकाशी भिडणार आहेत. मात्र, या सामन्यांवरून आजी-माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया समोर येत असून, आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज यांने या सामन्याबाबत मोठी भविष्यवाणी केली असून, त्याच्या या भविष्यवाणीमुळे भारतीय संघाच्या चिंता मात्र काहीश्या वाढल्या आहेत.(India VS Pakistan  Shoaib Akhtars prediction said Pakistan will beat India in the upcoming World Cup)

भारतात होऊ घातलेल्या विश्वचषकातील भारत पाकिस्तान सामान्याबाबत बोलताना माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर म्हणाला की, आतापर्यंत एकदिवशीय विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान हे जेंव्हा-जेंव्हा एकमेंकासमोर आले तेव्हा भारतीय संघाने सामना जिंकत पाकिस्तानचा पराभव केला आहे. विश्वचषकातील या महत्त्वाच्या सामन्यात दबाव अधिक चांगल्या पद्धतीने हाताळण्यात पाकिस्तानची असमर्थता दिसून येत असल्याने पाकिस्तान संघाचा पराभव होतो असेही शोएब अख्तर म्हणाला.

मायदेशात हरविण्याची संधी

- Advertisement -

एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शोएब अख्तर म्हणाला की, भारताला भारतातच जाऊन हरवणे यापेक्षा दुसरी मोठी संधी कोणतीच नाही. ते मायदेशात खेळत असल्याने त्यांच्यावर दबाव असणार आहे तेव्हा प्रेशरमध्ये असलेल्या अशा टीमचा फायदा घेऊन विजय खेचून आणणे काही अवघड होणार नसल्याचेही शोएब अख्तर म्हणाला.

हेही वाचा : India vs Ireland 1st T20 : अनुभवी नव्हे तर नवख्यांच्या साथीने जसप्रीत बुमराह करणार आयर्लंडशी दोन हात

आशिया चषकात दिसणार टशन

- Advertisement -

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन संघ भिडण्यापूर्वी आशिया चषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गट-अ मध्ये समाविष्ट आहेत. उभय संघांमधील सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर होणार आहे. जिथे पाकिस्तानने या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. त्याचवेळी टीम इंडियाच्या घोषणेकडे सर्वांच्या नजरा खिळल्या असून 20 ऑगस्टला संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ODI World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, स्टार खेळाडूची निवृत्तीनंतर पुन्हा एन्ट्री

14 ऑक्टोबरला रंगणार सामना

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंगतदार सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात येणार आहे. या ब्लॉकबास्टर सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील माजी खेळाडूंनी आपापली मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisment -