घरक्रीडाIND vs SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज निर्णायक लढत

IND vs SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज निर्णायक लढत

Subscribe

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वनडे सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. दुसरा सामना भारताने जिंकला. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघाने 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा अखेरचा सामना आज खेळवला जाणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम येथे सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना मालिकेतील विजेता समोर आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. (India vs south Africa 3rd odi final match)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वनडे सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. दुसरा सामना भारताने जिंकला. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघाने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. परंतु, आजचा सामना जिकणारा संघ या तीन वनडे मालिकेचा विजेता संघ असणार आहे.

- Advertisement -

अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी काहीशी धिमी असली तरी बाऊंड्रीज अधिक मोठ्या नसून आऊटफिल्डही क्विक असल्याने चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णयही संघ घेऊ शकतात. तसंच फिरकीपटूंना काही प्रमाणात मदत मिळण्याची शक्यता असल्याने भारत ही आपले स्टार फिरकीपटू मैदानात उतरवू शकतो.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापंर्यंत 89 एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी 51 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, दक्षिण आफ्रिका संघाला 35 सामने जिंकता आले आहेत. यातील तीन सामने अनिर्णित देखील सुटले आहेत.

- Advertisement -

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 9 धावांनी गमावला होता. ज्यामुळे मालिकेतील पहिला सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेने 1-0 ची आघाडी घेतली. ज्यानंतर दुसरा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकत मालिकेत 1-1 ची बरोबरी घेतली आहे. ज्यानंतर आज होणारा तिसरा सामना जो संघ जिंकेल तो मालिकाही 2-1 ने खिशात घालणार आहे.

संभाव्य भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर.


हेही वाचा – अंडर-17 महिला विश्वचषकात भारतासह 16 संघ सहभागी; आजपासून होणार सुरुवात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -