IND vs SA: दक्षिण आफ्रिका संघाला भारताचा ‘हा’ खेळाडू पडू शकतो भारी, यॉर्कर फेकण्यात आहे बादशाह

आयपीएल २०२२ (IPL 2022 )च्या १५ व्या हंगामात गुजरात टायटन्स (GT) या संघाने राजस्थान रॉयल्सचा (RR) पराभव करत आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. तसेच आयपीएलचं यंदाचं हंगाम संपन्न झालं आहे. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघात ९ जूनपासून १९ जूनदरम्यान पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी निवडकर्त्यांनी अतिशय धोकादायक वेगवान गोलंदाजाला संधी दिली आहे.

दक्षिण आफ्रिका संघाला भारताचा ‘हा’ खेळाडू पडू शकतो भारी

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिका संघाला टी-२० मालिकेत भारी पडू शकतो. कारण हा गोलंदाज यॉर्कर टाकण्यात बादशाह आहे. अलीकडेच, या वेगवान गोलंदाजाने आयपीएल २०२२ मध्ये विरोधी संघाच्या फलंदाजांना चांगलंच धारेवर घेतलं आहे. या आधारावर या गोलंदाजाची निवड समितीन टीम इंडियाने निवड केली आहे.

कोण आहे हा खेळाडू?

निवडकर्त्यांनी प्रथमच टीम इंडियामध्ये डेथ ओव्हर्स (अंतिम ओव्हर्स) स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची निवड केली आहे. अर्शदीप सिंगने १३ आयपीएल सामन्यांमध्ये १० विकेट्स घेतल्या असतील, परंतु वाइड यॉर्कर्स आणि ब्लॉक-होल गोलंदाजी करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं आहे.

अंतिम ओव्हर्सचा बादशाह

अर्शदीप सिंग हा आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जसाठी अंतिम ओव्हर्समध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे. या टप्प्यातील सर्व गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंगचा ७.३१ चा इकॉनॉमी रेट सर्वोत्तम आहे. अंतिम ओव्हर्समध्ये तो यॉर्कर्ससह उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो. सामन्यातील दबावाच्या परिस्थितीतही अर्शदीप सिंग सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. दबावातही अर्शदीप सिंग शांत राहतो आणि अंतिम ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करत आहे. यावरून अर्शदीप सिंगची प्रगती झपाट्याने होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याची निवड टीम इंडियामध्ये झाली आहे.

असा आहे भारताचा टी-२० आंतरराष्ट्रीय संघ –

लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल , रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.


हेही वाचा : चीनला १० देशांकडून मोठा झटका, काय आहे कारण?