पावसाची जोरदार बॅटिंग; भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिला टी-२० सामना रद्द

india vs south africa first t20 match abandoned due to rain in Dharamsala
धर्मशाला येथील HPCA स्टेडियमवर पावसाचा कहर

धर्मशाला येथे आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा पहिला टी-२ सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. धर्मशाळामध्ये गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत होता. त्यातच हवामानखात्याने रविवारीही पावसाची शक्यता वर्तवली होती आणि तसेच झाले. या मैदानावर पाण्याचा निचरा करण्याची चांगली व्यवस्था असल्याने सामना उशिरा तरी सुरु होईल अशी आशा होती. मात्र, पावसामुळे नाणेफेक होण्याआधीच हा सामना रद्द करावा लागला. आता तीन सामन्यांच्या या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मोहालीत १८ सप्टेंबर रोजी होणार आहे.