India vs South Africa, ODI Team: आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला रोहित मुकणार, राहुलकडे कर्णधारपदाची धुरा

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे रोहित शर्मा आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. या मालिकेत रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु रोहित शर्मा खेळणार नसल्यामुळे के एल राहुलकडे संघाचे नेतृत्व असेल. अखिल भारतीय निवड समितीने १९ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मलिका सामन्यांसाठी भारतीय संघ घोषित केला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा म्हणाले की, रोहित शर्मा अद्याप खेळण्यासाठी तंदुरुस्त झाला नाही परंतु मैदानावर परतण्यासाठी मेहनत घेत आहे. रोहित शर्माविषयी आम्हाला कोणताही धोका नको आहे. तसेच के एल राहुल चांगला खेळाडू असून भविष्यासाठी त्याला तयार करण्याचा प्रयत्न आहे. राहुलकडे कर्णधारपदाचा अनुभव आहे आणि त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे तो चांगल्या पद्धतीने कामगिरी करेल अशी खात्री असल्याचे चेतन शर्मा यांनी म्हटलं आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ८ गडी बाद करणारा वेगवाद गोलंदाज मोहम्मद शमीला एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तर उपकर्णधाराची पदाची जबाबदारी जसप्रीत बुमराकडे देण्यात आली आहे. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे गोलंदाज तंदुरुस्त नसल्यामुळे त्यांनाही संघात स्थान देण्यात आले नाही. फलंदाज ऋतुराज गायकवाडला संघात स्थान देण्यात आले असून तो अष्टपैलू फलंदाज शिखर धवनसोबत सलामीला येण्याची दाट शक्यता आहे. या एकदिवसीय मालिकेचे तीन सामने होणार असून १९, २१ आणि २३ जानेवारीला हे सामने पर्ल आणि केपटाऊनमध्ये खेळवण्यात येणार आहेत.

आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका महत्त्वाची मानली जात आहे कारण विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर पहिल्यांदाचा सामना होत आहे. रोहित शर्मा आता एकदिवसीय आणि टी-२० प्रकारातील कर्णधार आहे.


हेही वाचा : Harbhajan Singh on MS Dhoni: संघातून का वगळे अद्याप समजले नाही, हरभजन सिंगने व्यक्त केली खंत