Ind Vs SA : दक्षिण आफ्रिकेचा संघ ‘या’ दिवशी दिल्लीला पोहोचणार; 9 जूनला खेळणार पहिला टी-२० सामना

इंडियन प्रिमीयर लीगनंतर (IPL 2022) भारतीय संघ (Indian Cricket Team) आता दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्धची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ 2 जून रोजी भारतात येणार आहे.

इंडियन प्रिमीयर लीगनंतर (IPL 2022) भारतीय संघ (Indian Cricket Team) आता दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्धची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ 2 जून रोजी भारतात येणार आहे.

राजधानी दिल्लीत हा संघ पोहोचणार असल्याचे समजते. यासोबतच भारतीय संघातीलही 5 खेळाडू गुरूवारी दिल्लीला (Delhi) दाखल होणार आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेला येत्या 9 जून रोजी सुरूवात होणार आहे. त्यानुसार, पहिली टी-२० (T-20) मालिका खेळवण्यात येणार आहे.

या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघाची घोषणा केली आहे. या संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. शिवाय, भारतीय संघात ऑलराऊंडर (all-rounder) हार्दिक पांड्याचा समावेश करण्यात आला आहे. तर उम्रान मलिक आणि अर्शदीप सिंह यांना टीम इंडियाच्या टी20 संघात पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.

टी-20 मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला टी-20 सामना, 9 जून 2022
  • दुसरा टी-20 सामना, 12 जून 2022
  • तिसरा टी-20 सामना, 14 जून 2022
  • चौथा टी-20 सामना, 17 जून 2022
  • पाचवा टी-20 सामना, 19 जून 2022

भारतीय संघ :

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिकेचा संघ :

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वॅन डर डसन, मार्को जॅनसेन.


हेही वाचा – NED vs WI : शाय होपची शतकी खेळी, वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून नेदरलँड्सवर विजय