घरक्रीडाटी-२० सामन्यात टीम इंडियाचा आफ्रिकेवर दणदणीत विजय

टी-२० सामन्यात टीम इंडियाचा आफ्रिकेवर दणदणीत विजय

Subscribe

भारतीय संघाने ७ गडी राखून दक्षिण आफ्रिकेवर मात केली आहे. या मालिकेत भारत १-० ने आघाडीवर आहे.

धर्मशाला येथील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० सामना जोरदार पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका हा टी-२० सामना दुसऱ्यांदा मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला गेला. सर्व क्रिकेटप्रेमींचं बुधवारी या टी-२० सामन्याकडे लक्ष लागलं होतं. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचे ७ गडी राखून विजय मिळवला आहे. यामध्ये भारतीय संघाच्या कर्णधार विराट कोहलीने दणदणीत अर्धशतकाचा सिंहाचा वाटा राहिला.

या दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा दीपक चहरने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या हेंड्रिग्जला ६ धावांवर बाद केलं. १० षटकांमध्ये १ फलंदाज गमावत दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात ७८ धावा केल्या. क्विंटन डी कॉक या सामन्यात अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर क्विंटन डी कॉक हा ८८ धावांवर बाद झाला. तसंच रासी वॅन दुसेनला एव धाव काढून रविंद्र जडेजानं माघारी पाठवले. मग पुन्हा रविंद्र जडेजानं टेम्बा बवूमाची कॅच घेईन आऊट केलं. आफ्रिकेने १८ षटकांनंतर ४ गडी बाद होऊन १२९ धावा केल्या. हार्दीक पांड्यानं डेव्हिड मिलरला १८ धावांवर बाद केलं. त्यानंतर आफ्रिकेने भारतापुढे विजयासाठी १५० धावांचे आव्हान दिलं.

- Advertisement -

भारतीय टीमकडून पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा आणि शिखर धवन मैदानात उतरले. सलामीवीर रोहित शर्माने १२ धावांवर माघारी परतावे लागले. भारताने ६ षटकांनंतर एक गडी बाद होऊन ४७ धावा केल्या. अफलातूल अशी सुपर कॅच पकडत डेव्हिड मिलरने शिखर धवनला आऊट केलं. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने अर्धशतक पूर्ण केलं. विराट कोहलीने नाबाद ७२ धावा केल्या आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -