घरक्रीडाIND vs SL : भारताच्या आणखी दोन क्रिकेटपटूंना कोरोना; श्रीलंकेतच थांबावे लागणार

IND vs SL : भारताच्या आणखी दोन क्रिकेटपटूंना कोरोना; श्रीलंकेतच थांबावे लागणार

Subscribe

अष्टपैलू कृणाल पांड्याला सर्वात आधी कोरोनाची बाधा झाली होती. 

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-२० सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवत तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी बाजी मारली. भारताने या मालिकेची सुरुवात विजयाने केली होती. मात्र, दुसऱ्या टी-२० सामन्याच्या दिवशी भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी झाली आणि यात अष्टपैलू कृणाल पांड्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यातच आठ खेळाडू त्याच्या संपर्कात आल्याने त्यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले. त्यामुळे हे खेळाडू बुधवार आणि गुरुवारी झालेल्या अखेरच्या दोन टी-२० सामन्यांना मुकले. आता या आठ खेळाडूंपैकी युजवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम या फिरकीपटूंनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे श्रीलंका दौरा संपला असला तरी कृणाल, चहल आणि गौतम यांना आणखी काही दिवस कोलंबो येथेच थांबावे लागणार आहे.

तिघे कोलंबोमध्येच थांबतील  

कृणालची २७ जुलैला अँटीजेन आणि आरटी-पीसीआर अशा दोन्ही प्रकारच्या कोरोना चाचण्या झाल्या. या दोन्ही चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला त्वरित क्वारंटाईन व्हावे लागले. तसेच त्याच्या संपर्कात आलेले आठ खेळाडूही क्वारंटाईन झाले. यापैकी चहल आणि गौतम यांचा कोरोनाचा अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हे तिघे कोलंबोमध्येच थांबतील. तर कृणालच्या संपर्कात आलेल्या आठ जणांपैकी हार्दिक, मनीष पांडे, दीपक चहर आणि ईशान किशन यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ते अन्य खेळाडूंसह मायदेशी परतणार आहेत.

- Advertisement -

पृथ्वी, सूर्या इंग्लंडसाठी रवाना होणार

तसेच पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव या मुंबईकर फलंदाजांचा इंग्लंडला जाण्याचा मार्गही मोकळा आहे. या दोघांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ते थेट श्रीलंकेहून इंग्लंडसाठी रवाना होतील. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी पृथ्वी आणि सूर्यकुमार यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅम येथे खेळला जाईल.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -