घरक्रीडावेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता

वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता

Subscribe

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू आहे. तीन सामन्यांची ही मालिका असून या मालिकेतील २ सामन्यांत भारताने विजय मिळवत मालिका खिशात घातली.

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू आहे. तीन सामन्यांची ही मालिका असून या मालिकेतील २ सामन्यांत भारताने विजय मिळवत मालिका खिशात घातली. आज या मालिकेतील अखेरचा सामना होणार आहे. या सामन्यातील भारताने संघात मोठे बदल केले जाऊ शकतात.

या सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार, भारतीय संघात युवा खेळाडूंनी संधी मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या सलामीवीरांमध्ये बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांना एकही संधी मिळालेली नाही. त्यामुळे या सामन्यात या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते.

- Advertisement -

भारताच्या वेगवान गोलंदाजीमध्ये एक बदल होऊ शकतो. या सामन्यात भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तिसऱ्या वनडेसाठी भारताच्या संघात कोणाची निवड होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सामना कुठे आणि कधी पाहाल

- Advertisement -
  • भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होणार आहेत.
  • या सामन्याचा टॉस ६.३० वाजता होणार आहे.
  • टॉसनंतर अर्ध्या तासानंतर सामना सुरु करण्यात येणार आहे.
  • भारतीय चाहत्यांसाठी हा सामना डीडी स्पोर्ट्स-१ या वाहिनीवर लाइव्ह पाहता येणार आहे.

भारतीय संघ :

शिखर धवन (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दिपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर) संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, यजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.


हेही वाचा – कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेला ‘हे’ स्टार भारतीय खेळाडू मुकणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -