भारत-वेस्ट इंडिज चौथा वनडे सामना वानखेडेऐवजी ब्रेबॉनवर

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा वनडे सामना वानखेडे स्टेडियमऐवजी ब्रेबॉन स्टेडियमवर होणार आहे.

ब्रेबॉन स्टेडियम (सौ-ICC)

मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि भारतीय नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातील मतभेदामुळे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील २९ ऑक्टोबरला होणार चौथा वनडे सामना वानखेडे स्टेडियमऐवजी ब्रेबॉन स्टेडियमवर होणार आहे. २००९ नंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना २०,००० ची क्षमता असणाऱ्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर होईल.

आर्थिक अडचणी, कॉम्प्लिमेंटरी तिकिटे या कारणांनी वानखेडेवर सामना नाही

मुंबई क्रिकेट असोसिएशनने आर्थिक अडचणी, कॉम्प्लिमेंटरी (मानार्थ) तिकिटे यासारख्या काही कारणांमुळे वानखेडे स्टेडियमवर होणारा सामना दुसरीकडे खेळवण्याची बीसीसीआयला विनंती केली होती. त्यामुळेच आता हा चौथा वनडे सामना मुंबईतीलच ब्रेबॉर्न स्टेडिअमवर होईल.

कॉम्प्लिमेंटरी तिकिटांवरून बीसीसीआय आणि राज्य बोर्डांमध्ये वाद 

कॉम्प्लिमेंटरी (मानार्थ) तिकिटे या विषयावरून बीसीसीआय आणि राज्य बोर्ड यांच्यात वाद होण्याची पहिली वेळ नाही. याआधी याच विषयावरून मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे याच मालिकेतील दुसरा वनडे सामना इंदूरऐवजी विशाखापट्टणममध्ये आहे.