IND vs WI 4th ODI Live : भारताचा २२४ धावांनी विजय

भारत विरुद्ध विंडीज चौथ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

खलील अहमद (सौ-Cricinfo)

कुलदीप यादवने किमार रोचला बाद करत भारताला विजय मिळवून दिला. भारताने हा सामना २२४ धावांनी जिंकला आहे.


कर्णधार जेसन होल्डरने एकहाती झुंज देत अर्धशतक झळकावले आहे.


खलील अहमद आणि कुलदीप यादवच्या चांगल्या गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजचे फलंदाज झटपट माघारी परतले आहेत.


खलील अहमदने शिमरॉन हेटमायर आणि रोवमन पॉवेल यांना झटपट माघारी पाठवले आहे. त्यामुळे ३७८ धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीजचा अर्धा संघ माघारी परतला आहे.


३७८ धावांचा पाठलाग करताना विंडीजची अडखळती सुरुवात झाली आहे. सलामीवीर चंद्रपॉल हेमराज, शाई होप आणि किरन पॉवेल झटपट माघारी परतले आहेत.


अखेरच्या काही षटकांत धोनी, केदार जाधव आणि जडेजाने फटकेबाजी करत भारताचा स्कोर ३७७ पर्यंत नेला.


शतक पूर्ण झल्यावर अंबाती रायडू रनआऊट झाला आहे. त्याला फेबिअन अॅलनने बाद केले.


रायडूचे कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण. त्याने अवघ्या ८० चेंडूंत हे शतक पूर्ण केले.


१६२ धावा करून रोहित बाद झाला. त्याला नर्सने बाद केले


रोहितने कारकिर्दीत सातव्यांदा १५० ची धावसंख्या पार केली आहे.


रायडूने मालिकेतील दुसरे अर्धशतक केले आहे.


रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीतील २१ वे शतक शतक झळकावले आहे. हे शतक त्याने ९८ चेंडूंत पूर्ण केले.


रोहित शर्माचे अर्धशतक पूर्ण.


कर्णधार कोहली या मालिकेत पहिल्यांदाच शतक न मारता बाद झाला आहे. त्याला किमार रोचने १६ धावांवर बाद केले.


३८ धावा करून शिखर धवन बाद झाला आहे.


भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली आहे. ८ षटकांत भारताच्या ५० धावा पूर्ण.


भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. रिषभ पंतच्या जागी केदार जाधव आणि चहालच्या जागी जडेजाला संघात स्थान मिळाले आहे.


भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. रिषभ पंतच्या जागी केदार जाधव आणि चहालच्या जागी जडेजाला संघात स्थान मिळाले आहे.


चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.