घरक्रीडाIND vs WIN 1st Test Live Updates : वेस्ट इंडिजची अवस्था बिकट

IND vs WIN 1st Test Live Updates : वेस्ट इंडिजची अवस्था बिकट

Subscribe
  • वेस्ट इंडिज भारतापासून अजून ५५५ धावांनी पिछाडीवर आहे. तर त्यांना फॉलोऑन वाचवण्यासाठी अजून ३५५ धावा कराव्या लागतील.
  • भारताने ६४९ धावांवर डाव घोषित केल्यानंतर वेस्ट इंडिजच्या डावाची खराब सुरूवात झाली आहे. भारताच्या चांगल्या गोलंदाजीमुळे दुसऱ्या दिवसाअखेर वेस्ट इंडिजची अवस्था ६ बाद ९४ अशी आहे. भारतातर्फे मोहम्मद शमीने २ तर अश्विन, जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली आहे.
  • राजकोट कसोटीत भारताने पहिला डाव ६४९/९ धावांवर घोषित केला. दुसऱ्या दिवशी भारतातर्फे कर्णधार विराट कोहली याने शतक साजरे केले. त्याला रिषभ पंतने चांगली साथ दिली. रिषभचे शतक थोडक्यात हुकले. रिषभ पंत ९२ धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्य अष्टपैलु रविंद्र जडेजा याने तुफान फटकेबाजी करत शतकी खेळी साकारली.

 

- Advertisement -


  • पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेर भारताची धावसंख्या ४ बाद ३६४ आहे. कर्णधार कोहली (७२) आणि रिषभ पंत (१७) मैदानात टिकून आहेत.
  • कर्णधार कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे तर रहाणे अर्धशतकापासून १० धावांनी मागे आहे. कर्णधार कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे तर रहाणे ४१ धावा करून बाद झाला.
  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या पहिल्या कसोटीत भारतीय फलदांजानी चांगली सुरुवात केल्यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड घेत भारताच्या तीन फलदांजाना माघारी धाडले. त्यानंतर चौथ्या विकेटसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरला आहे.

Ind vs WI : पदार्पणातच पृथ्वी शॉची सेंच्युरी


 

- Advertisement -

तत्पूर्वी राजकोट येथे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुल सलामीवीर म्हणून मैदानात उतरले होते. मात्र लोकेश राहुल या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. चार चेंडू खेळून भोपळाही न फोडता गॅब्रीयलने त्याला माघारी धाडले. त्यानंतर मात्र पृथ्वी शॉने चेतेश्वर पुजाराच्या मदतीने डाव सावरला. कसोटी पदार्पणातच पृथ्वी शॉने शानदार शतक झळकावले. चेतेश्वर पुजाराने देखील त्याला उत्तम साथ देत १३० चेंडूत ८६ धावा केल्या आणि शर्मन लेविसच्या गोलंदाजीवर तो आपली विकेट गमावून बसला. त्यानंतर बिशोच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ देखील बाद झाला. पहिल्याच कसोटीत १५४ चेंडूत त्याने १३४ धावा ठोकल्या.

हे माहितेय का – १५ भारतीय खेळाडू ज्यांनी कसोटी पदार्पणात शतक झळकावले

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -