घरक्रीडाIND vs WI: अहमदाबादमध्ये तब्बल १० वर्षानंतर टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज...

IND vs WI: अहमदाबादमध्ये तब्बल १० वर्षानंतर टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज आमनेसामने

Subscribe

टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज यांच्यात वनडे सीरीजचा सामना खेळला जाणार आहे. ६ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दोन्ही संघांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. टीम इंडियाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड उत्तम आहे. संघाने १५ सामन्यांमधून ७ सीरीज जिंकले आहेत. या दोन्ही संघामध्ये ५ वनडे मालिकांचा थरार रंगला होता. त्यामध्ये टीम इंडियाने एक सामना जिंकला होता. तर चार सामने वेस्ट इंडीज टीमने जिंकले होते.

टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज या दोन संघातला शेवटचा वनडे सामना डिसेंबर २०११ मध्ये खेळण्यात आला होता. वेस्ट इंडिजने १६ धावांनी विजय मिळवला होता. टीम इंडियाने शेवटची वनडे मालिका श्रीलंकेविरूद्ध खेळली होती. नोव्हेंबर २०१४ मध्ये खेळलेल्या सामन्यात टीम इंडियाने ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता.

- Advertisement -

टीम इंडियाने जिंकल्या १५ पैकी ७ वनडे सीरीज

टीम इंडियाने १५ पैकी ७ वनडे सीरीज जिंकल्या आहेत. या मैदानावार टीम इंडियाने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया सारख्या दिग्गज संघांना पराभूत केलंय. दरम्यान, टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज या दोन्ही संघांमध्ये वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. वनडेसाठी तीन सामन्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सीरीजचा पहिला सामना ६ फेब्रुवारी आणि दुसरा सामना ९ आणि तिसरा सामना ११ फेब्रुवारी रोजी खेळण्यात येणार आहे. याचदरम्यान रोहित शर्मा टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.


हेही वाचा : विधानपरिषदेतील १२ सदस्यांची यादी RTI मध्ये देण्यास शासनाचा नकार

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -