घरक्रीडाInd vs WI : पदार्पणातच पृथ्वी शॉची सेंच्युरी

Ind vs WI : पदार्पणातच पृथ्वी शॉची सेंच्युरी

Subscribe

पदार्पणाच्या सामन्यात क्रिकेटच्या देवाला जमले नाही, ती कामगिरी पृथ्वी शॉ याने करुन दाखवली आहे. पदार्पणाच्या सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉ याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई करत शतक साजरे केले आहे.

आज राजकोट येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतला पहिला सामना खेळवला जात आहे. सकाळी नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉ याला खेळवण्यात आले आहे. पदार्पणाच्या सामन्यात पृथ्वीने इंडिजच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. पहिल्याच सामन्यात शतक झळकावून पृथ्वी शॉ याने त्याची निवड योग्य असल्याचे सिद्ध केले आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी अनुभवी खेळाडू लोकेश राहुल याच्यासह सलामीला आला. पहिल्याच षटकात राहुल पायचीत होऊन माघारी परतला. त्यानंतर पृथ्वी आणि चेतेश्वर यांनी सामन्याची सुत्र हाती घेतली. त्याने चेतेश्वर पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत दिडशतकी भागीदारी केली. याच दरम्यान त्याने वैयक्तिक शतकही झळकावले. त्याने ९८ चेंडूंत १०१ धावांची खेळी साकारली आहे. ही खेळी साकारताना त्याने चौफेर फटकेबाजी करत १५ चौकार लगावले.

- Advertisement -

पदार्पणातल्या शतकांची परंपरा

पृथ्वी शॉ याने आतापर्यंत क्रिकेटच्या तीन फॉरमॅट्समध्ये शतक झळकावले आहे. पृथ्वीने रणजी ट्रॉफीमध्ये शतकाने पदार्पण केले होते. दुलीप ट्रॉफीमध्येदेखील पदार्पणाच्या सामन्यात पृथ्वीने शतक झळकावले होते. त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावून पृथ्वीने त्याची शतकांची परंपरा कायम राखली आहे.


लोकेश राहुल बाद झाल्यानंतर काही षटके पुजारा आणि पृथ्वी यांनी सावधपणे खेळून काढली. परंतु खेळपट्टीवर स्थिर झाल्यानंतर दोघांनीही फटकेबाजी करायला सुरूवात केली. उपाहारानंतर पृथ्वी आणि पुजारा यांनी धावांची गती कायम राखली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १८५ धावांची भागीदारी केली. भारताने आतापर्यंत ३६ षटकांमध्ये एका विकेटच्या बदल्यात १८८ धावांची मजल मारली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -