घरक्रीडातिसऱ्या सामन्यासह भारतानं मालिकाही जिंकली; विंडीजचा धुव्वा

तिसऱ्या सामन्यासह भारतानं मालिकाही जिंकली; विंडीजचा धुव्वा

Subscribe

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा निर्णायक सामना वानखेडे मैदानावर रंगला. याअगोदर पहिला सामना हा भारताने जिंकला होता तर दुसरा सामना वेस्ट इंडिजने जिंकला होता. आता पुन्हा एकदा भारताने सामन्यासह मालिकाही जिंकली आहे. भारतीय संघाने विजयासाठी वेस्ट इंडिजला २४१ धावांचं आव्हान दिलं होत. मात्र हे आव्हान विंडीजला पेलवलं नाही. फक्त १७३ धावांपर्यंत वेस्ट इंडिज मजल मारू शकले.

तिसऱ्या निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडून पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा आणि के.एल. राहुल मैदावर उतरले. रोहित शर्माने दमदार चौकाराने सामन्याला सुरुवात केली. भारताने ४ षटकांतमध्ये अर्धशतक पूर्ण केले. तसंच रोहित शर्माने देखील २२ बॉलमध्ये धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केलं. भारताने ८ व्या षटकांतच १०० धावंचा टप्पा ओलांडला आहे. के.एल. राहुलने २९ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर रोहित शर्माला ७१ धावांवर बाद झाला. रोहितने ३४ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकार मारले. मग रिषभ पंत मैदानावर आला. मात्र त्याने एक धाव न करता जेसन होल्डरने झेल घेऊन रिषभ पंत माघारी पाठवले. के.एल. राहुल आणि विराट कोहलीच्या साथीने भारतीय संघाने द्विशतकी टप्पा देखील ओलांडला आहे. या सामन्यात रोहित शर्मा, के.एल. राहूल यांच्यासह विराट कोहलीने देखील २१ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. कोट्रेलच्या गोलंदाजीवर के.एल. राहुलला ९१ धावांवर बाद केलं. भारतीय संघाने २४० धावा करून विंडीजला २४१ धावांचं आव्हान दिलं.

- Advertisement -

वेस्ट इंडिज संघातून पहिल्यांदा लेंडल सिमन्स आणि ब्रँडन किंग मैदानात उतरले. ब्रँडन किंगनला ५ धावांवर राहुलने झेल घेऊन माघारी पाठवले आहे. त्यानंतर मोहम्मद शम्मीच्या गोलंदाजीवर लेंडन सिमन्स या देखील आऊट केलं. तसंच दीपक चहरच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने झेल घेऊन पूरन याला माघारी परतवले. त्यानंतर हेटमायर आणि पोलार्डची जोडी फुटली. हेटमायरला ४१ धावांवर राहुलने झेल घेऊन माघारी पाठवलं. मग जेसन होल्डरला ८ धावांवर कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीवर बाद केलं. त्यानंतर पोर्लाड अर्धशतक पूर्ण केलं. मग भुवनेश्वर याच्या गोलंदाजीवर पोर्लाडला ६८ धावांवर बाद केलं. वॉल्शला ९ धावांवर बाद करण्यात आलं. जडेजाने झेल घेऊन पेरी माघारी पाठवलं. त्यानंतर भारताने सामन्यासह वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी पराभव करून मालिकाही जिंकली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -