घरक्रीडाकॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टर्सची जबरदस्त कामगिरी, विकास ठाकूरला रौप्यपदक

कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टर्सची जबरदस्त कामगिरी, विकास ठाकूरला रौप्यपदक

Subscribe

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. वेटलिफ्टर विकास ठाकूरने पुरुषांच्या ९६ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवलं आहे. कॉमनवेल्थ गेम्समधील आजच्या दिवसभरातील भारताने हे तिसरं पदक मिळवलं असून लॉन बॉल्समध्ये महिला संघाने आणि टेबल टेनिसमध्ये पुरूष संघाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

विकास ठाकूरने फायनल राऊंडमधील स्नॅच राऊंडमध्ये १५५ किलोग्रॅम वजन उचलत तिसरं स्थान पटकावलं. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये त्याने सर्वोत्तम कामगिरी करत तिसऱ्या प्रयत्नात १९१ किलोग्रॅम वजन उचललं आहे. अशारितीने विकासने एकूण ३४६ किलोग्रॅम वजन उचलत एक दमदार कामगिरी करत भारताला रौप्यपदक मिळवून दिलं.

- Advertisement -

भारताने वेटलिफ्टिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत एकूण आठ पदकं एकाच खेळात जिंकली आहेत. यामध्ये आतापर्यंत भारताला वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू, अचिंता शेउली, जेरेमी लालरिनुंगा यांनी सुवर्णपदक जिंकलं असून संकेत सरगर आणि बिंद्याराणी देवी यांनी रौप्यपदक मिळवून दिलं आहे.

- Advertisement -

काल भारताने ७१ किलो वजनी गट वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावले. हरजिंदर कौरने हे पदक पटकावले होते. तसेच ज्यूदोमध्ये सुशिला देवी लिकमाबामने रौप्य तर पुरूषांमध्ये विजय कुमार यादवने कांस्यपदक पटकावले. भारताने आतापर्यंत ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्यपदके पटकावली आहेत.

पुनम यादवची स्नॅच प्रकारात उत्तम कामगिरी

७६ किलो महिला वेटलिफ्टिंमध्ये भारताच्या पुनम यादवने स्नॅच इव्हेंटमध्ये दुसऱ्या प्रयत्नात ९५ तर तिसऱ्या प्रयत्नात ९८ किलो वजन उचलले. स्नॅच प्रकारात कॅनडाच्या माया लेयलोरने १०० किलो वजन उचलून अव्वल स्थान पटकावले आहे.


हेही वाचा : इतिहासात प्रथमच भारताने लॉन बाऊल्समध्ये सुवर्णपदक पटकावले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -