घरक्रीडापाकिस्तान विरुद्ध भारत विजयी

पाकिस्तान विरुद्ध भारत विजयी

Subscribe

 १९ वर्षांखालील आशिया चषक

सलामीवीर अर्जुन आझाद आणि तिलक वर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६० धावांनी पराभव केला. भारताच्या युवा संघाचा हा या स्पर्धेतील दुसरा विजय होता.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकूनप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर सुवेद पारकर अवघ्या ३ धावा करून माघारी परतला. मात्र, यानंतर अर्जुन आझाद आणि तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने अप्रतिम फलंदाजी केली. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी १८३ धावांची भागीदारी केली. अर्जुनने १११ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १२१ धावा केल्या. त्याला वर्माने उत्तम साथ देत ११९ चेंडूत ११० धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना चांगले प्रदर्शन करता आले नाही. मात्र, तरीही भारताने ५० षटकांत ९ विकेट गमावत ३०५ धावा केल्या.

- Advertisement -

याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांची ११ व्या षटकात ३ बाद ५३ अशी अवस्था होती. परंतु, कर्णधार रोहील नझीर (११७) आणि हॅरिस खान (४३) यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तानचा डाव २४५ धावांवर आटोपला. भारताच्या अथर्व अंकोलेकरने ३ गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक  भारत : ५० षटकांत ९ बाद ३०५ (अर्जुन आझाद १२१, तिलक वर्मा ११०; नसीम शाह ३/५२) विजयी वि. पाकिस्तान : ४६.४ षटकांत सर्वबाद २४५ (रोहील नझीर ११७, हॅरिस खान ४३; अथर्व अंकोलेकर ३/३६).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -