घरक्रीडाMATCH UPDATE: गुणतालिकेत भारताची दुसऱ्या स्थानी झेप

MATCH UPDATE: गुणतालिकेत भारताची दुसऱ्या स्थानी झेप

Subscribe

भारतीय संघाने आजचा सामना जिंकला तर, सेमीफाइनलमध्ये प्रवेश करेल.

वेस्ट इंडिजची ख्रिस गेल याची पहिली विकेट पडली आहे. ख्रिस गेलने फक्त ६ रन केले आहेत. वेस्ट इंडिज १०/१ (४.५ ओव्हर)


भारतीय संघातील मोहम्मद शम्मीची सातवी विकेट पडली आहे. वेस्ट इंडिजच्या शेल्डन कोट्रेलने शम्मीची विकेट घेतली आहे. भारत २६२/७ (४९.५ ओव्हर)

- Advertisement -

भारतीय संघातील हार्दीक पांड्याची सहावी विकेट वेस्ट इंडिजचा ओशन थॉमसने घेतली आहे. पांडेने ४६ रन केले आहेत. भारत २४९/५ (४८.३ ओव्हर)


भारतीय संघातील महेंद्र सिंग धोनीचे अर्धशतक पूर्ण

- Advertisement -

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची रुपात पाचवा झटका लागला आहे. कोहलीने  ८२ बॉलमध्ये ७२ रन केले आहेत. जेसन होल्डरने कोहलीची विकेट घेतली आहे. भारत १८४/५ (३९.० ओव्हर)


भारतीय संघाला केदार जाधवच्या रुपात चौथा झटका लागला आहे. केदारने १०  बॉलचा सामना करत केवळ ७ रन केले आहेत. रोचच्या बॉलिंगवर केदारने विकेटकिपर शाई होपच्या हातात कॅच दिली आहे. भारत १५०/४ ( ३०.४ ओव्हर)


भारतीय संघाला तिसरा झटका लागला आहे. विजय शंकर १९ बॉलचा सामना करत केवळ १४ रन केले आहेत. रोचच्या बॉलिंगवर विजय शंकरने विकेटकिपर शाई होपच्या हातात कॅच दिली आहे.


भारत विरुद्ध वेस्टइंडीजच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णाधार विराट कोहलीने त्याच्या करिअरचे २० हजार रन पूर्ण केले आहेत. विराट कोहलीने ४१७ सामने खेळून हा विश्वविक्रम नोंदवला आहे. २० हजार रन्सचा टप्पा गाठणार जगात चौथा तर, भारताकडून २ विराट कोहली दुसरा ठरला आहे. महत्वाचे म्हणजे विराटने सर्वात जलद ४१७ सामन्यामध्ये २० हजार रन्सचा टप्पा गाठला आहे.(सचिन तेंडुलकर २० हजार रन ४५३ सामने, ब्रायन लारा २० हजार रन ४५३ सामने, रिकी पॉन्टिंग २० हजार रन ४६४ सामने)


भारत विरुद्ध वेस्टइंडीजच्या सामन्यात भारतीय संघाने दुसरी विकेट गमवली आहे. जेसन होल्डरच्या बॉलिंगवर के.एल राहुल क्लीन बोल्ड झाला आहे. राहुलने ६४ बॉलची खेळी करत ४८ रन्स केले आहेत. रोहित शर्माच्या विकेटनंतर विराट आणि राहुलने संयमी खेळी करत भारताची परिस्थिती मजबूत केली होती. परंतु राहुलच्या विकेटमुळे पुन्हा मैदानात शांतता पसरली आहे. शिखर धवनच्या जागेवर राहुलला संधी देण्यात आली होती.


भारतीय संघाला रोहीत शर्माच्या रुपात पहिला झटका लागला आहे. रोहीत शर्माने २३ बॉलचा सामना करत केवळ १८ धावा केल्या आहेत. रोचच्या बॉलिंगवर रोहीत शर्माने विकेटकिपर शाई होपच्या हातात कॅच दिली आहे.


भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड ग्राउंडवर मॅच होणार आहे. या सामन्यात भारताने प्रथम टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकात दोन्ही संघ आतापर्यंत आठ वेळा एकमेकांशी लढले आहेत.त्यापैकी भारतीय संघाने पाच जिंकले आहेत, तर वेस्टइंडीज संघाला तीन वेळा विजय मिळवता आला आहे.

विश्वचषक २०१९मध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. या सामन्यांपैकी वेस्टइंडिच्या संघाने केवळ एक सामना जिंकला आहे. वेस्ट इंडीजचा संघ तब्बल चार सामन्यांत तो पराभूत झाला आहे. तसेच एक सामना रद्द झाला आहे. दुसरीकडील भारतीय संघाने पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले आहेत. तर पावसामुळे एक सामना रद्द झाला आहे.

हवामान आणि पिच

मॅनचेस्टर गुरुवारी गुरुवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने पाकिस्तानला याच मैदानावर पराभूत केले आहे. यावेळीही पिचचा विचार केला जात आहे. पॅनेलचा फायदा घेतलेल्या संघाला याचा फायदा झाला आहे. यावेळी देखील, टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याची शक्यता वर्तलसी जात आहे.

संघ:

भारत: विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, रोहित शर्मा, विजय शंकर, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, केदार जाधव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, ऋषभ पंत.

वेस्टइंडीज: जेसन होल्डर (कर्णधार), क्रिस गेल, इविन लुइस, शिमरोन हेटमायेर, एशले नर्स, सुनील एंब्रिस, कार्लोस ब्रैथवेट, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप (विकेटकीपर), ओशाने थॉमस, शेल्टन कॉट्रेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -