घरक्रीडाजागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा : भारताची दुहेरी सुवर्णकामगिरी

जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा : भारताची दुहेरी सुवर्णकामगिरी

Subscribe

भारताच्या विजयवीर सिधूने वैयक्तिक आणि सांघिक खेळात धडाकेबाज कामगिरी करत भारताला दोन सुवर्णपदक मिळवून दिली आहेत.

चँगवॉन येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजपटूंनी अप्रतिम कामगिरी करत शुक्रवारी दोन सुवर्णपदक आपल्या नावे केली आहेत. नेमबाजपटू विजयवीर सिधूच्या कामगिरीच्या बळावर भारताने वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात सुवर्णपदक आपल्या नावे केले आहे. विजयवीर सिधूने कनिष्ठ गटातील २५ मीटर स्टँडर्ड पिस्तुल प्रकारात ५७२ गुण मिळवत वैयक्तिक गटाचे सुवर्णपदक आपल्या नावे केले तर त्यानंतर सांघिक गटात विजयवीरने आदर्श सिंग आणि राजकनवर संधू यांच्यासह १६९५ गुण मिळवत आणखी एक सुवर्णपदक मिळवले.

- Advertisement -

असे पार पडले सामने

वैयक्तिक गटात विजयवीरने कोरियाच्या गनहीयोक ली याला दोन गुणांनी मागे सोडले. गनहियोकने ५७० गुण मिळवले. तर तिसऱ्या क्रमांकावर चीनच्या हाओजे जहू याला ५६५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. सामन्यात भारताच्या विजयवीरला सुवर्णपदक, कोरियाच्या गनहीयोकला रौप्यपदक आणि चीनच्या हाओजेला कांस्यपदक मिळाले आहे. तर सांघिक गटात भारत आणि कोरिया संघात चुरशीची टक्कर झाली. भारताने १६९५ गुण मिळवले. तर कोरिया संघ अवघ्या दोन गुणांना मागे राहील्याने भारतीय संघ विजयी झाला. तर चेक रिपब्किकला तिसरे स्थान मिळाले आहे. सामन्यात भारतीय संघाला सुवर्णपदक, कोरियाच्या संघाला रौप्यपदक आणि चेक रिपब्किकला कांस्यपदक मिळाले आहे.

या दोन पदकांसह भारताच्या खात्यात एकूण ११ सुवर्णपदक, ९ रौप्यपदक आणि ७ कांस्यपदकं जमा झाली आहेत. या दोन पदकांसह भारताने गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -