आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत नेमबाजीत भारताला दुसरे सुवर्ण पदक

India wins second gold medal in shooting at ISSF World Cup
आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत नेमबाजीत भारताला दुसरे सुवर्ण पदक

आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत मिश्र 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक जिंकले आहे. या भारताकडून आशी चौकसे आणि स्वप्नील कुसाळे यांनी युक्रेनियनचा 16-12 फरकाने पराभव केला आहे. या विजयामुळे भारताला दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे.

बाकू येथील आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत मिश्र 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत स्वप्नील कुसळे आणि आशी चौकसे या भारतीय जोडीने पदक सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांनी युक्रेनियनचा 16-12 फरकाने पराभव केले आहे. दोघांनी अंतिम फेरीत युक्रेनच्या सेर्ही कुलिश आणि डारिया तिखोवा यांचा 16-12 असा पराभव केला. बाकू नेमबाजी विश्वचषकात भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी इलावेनिल वालारिवन, श्रेया अग्रवाल आणि रमिता या तिघांनी 10 मीटर एअर रायफल महिला सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले आहे.

ईलाव्हेनिल वालारिवान, रमिता आणि श्रेया अग्रवाल यांनी सुवर्णपदकाच्या लढतीत डेन्मार्कच्या अ‍ॅना निलसन, एमा कूच आणि रिकी माएंग इब्सनला 17-5 असा पराभव केला. पोलंडला या स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. माजी अग्रमानांकित व्हालारिवान, रमिता आणि श्रेया यांनी सोमवारी दोन टप्प्यांच्या पात्रता फेरीतून अंतिम फेरीत धडक मारली होती.