कांगारूंची विजयी घोडदौड रोखण्यात भारताला अपयश

बेथ मुनीचे शतक, मालिकेत २-० ने आघाडी

India Women vs Australia Women 2nd ODI Australia beat india

क्वीन्सलँडच्या मॅके येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला संघाला पाच गडी राखून पराभूत केले. बेथ मुनीच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले. शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला १३ धावांची गरज होती. मात्र, भारताची प्रमुख गोलंदाज झुलन गोस्वामी या धावा रोखम्यात अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाचा हा सलग २६ वा विजय असून मालिकेत २-० ने आघाडी मिळवली आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजी करण्यास पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात २७२ धावा केल्या. सलामीवीर स्मृती मंधानाच्या ८६ धावांच्या जोरावर भारताला एवढी मजल मारता आली. स्मृती मंधानासह रिचा घोषने ४४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ताहिलाने ३, सोफीने २ आणि ब्रॉऊन हिने १ गडी बाद केला.

भारताने दिलेल्या २७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाला अॅलिसा हिलीच्या रुपात पहिला झटका बसला. झुलन गोस्वामीने तिला त्रिफळाचित केले. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंग देखील फार काळ टिकू शकला नाही. सहा धावा करत तंबूत परतली. मेघना सिंगने तिला बाद केले. त्यानंतर एलिसा पेरी (२), अॅशले गार्डनर (१२) धावा करुन तंबूत परतल्या. यानंतर ताहिला आणि सलामीवीर मूनीने डाव सांभाळला आणि पाचव्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. दीप्ती शर्माने ताहिलाला बाद करत ही भागीदारी फोडली. पण मूनीने शेवटपर्यंत लढा देत संघाला विजय मिळवून दिला. मुनीने तिच्या डावात १३३ चेंडूंचा सामना केला आणि १३ चौकार लगावले. भारताच्या खिशात हा सामना होता. परंतु, बेथ मुनीने नाबाद १२५ धावांची शानदार खेळी करत भारताच्या तोंडून विजय हिसकावून घेतला. मूनि व्यतिरिक्त ताहिला मॅकग्रा ने ७४ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या षटकात १० धावांची गरज होती. सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला. शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना कॅरी बाद झाली. मात्र, पंचांनी हा चेंडू नो बॉल म्हणून घोषित केला. यामुळे शेवटच्या चेंडूत कॅरीने दोन धावा काढत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात भारताला गचाळ क्षेत्ररक्षणामुळे पराभव पत्कारावा लागला.