घरक्रीडाइंटरकॉन्टिनेंटल कप; भारत ३-० च्या फरकाने विजयी

इंटरकॉन्टिनेंटल कप; भारत ३-० च्या फरकाने विजयी

Subscribe

इंटरकॉन्टिनेंटल कपचा तिसरा सामना ४ जूनला मुंबईत पार पडला. हा सामना मुंबईमध्ये अंधेरी येथील ‘मुंबई फुटबॉल अरेना’ या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने ३-० च्या फरकाने केनियावर सहज विजय मिळवला. या विजयानंतर भारत या स्पर्धेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. सामन्याच्या पहिल्या ४५ मिनिटात एकही गोल झाला नाही. उत्तरार्धात मात्र ६८व्या मिनिटाला कर्णधार सुनील छेत्रीने गोल करुन भारताला सामन्यात आघाडी मिळवून दिली. यानंतर लगेचच ७१ व्या मिनिटाला जेजेने गोल करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. ९० मिनिटानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये पुन्हा कर्णधार सुनील छेत्रीने गोल करुन भारताचा विजय निश्चित केला.

सुनील छेत्रीने केली सामन्यांची सेंचुरी !

भारतीय फुटबॉल संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. यात खासकरुन कर्णधार सुनील छेत्रीचा खेळ पहाण्याजोगा आहे. भारत विरुद्ध केनिया हा कर्णधार सुनील छेत्रीचा शंभरावा सामना होता. आतापर्यंत सुनीलने १०० सामन्यांत ५९ गोल केले आहेत. सुनीलची आंतरराष्ट्रीय सामन्यातली ही खेळी नक्कीच उल्लेखनीय आहे.

- Advertisement -

एशिया कपच्या दिशेने भारताची घौडदौड सुरू

भारताने केनियाला हरवत या स्पर्धेत अव्वलस्थान गाठलं आहे. या आधीच्या सामन्यातही भारताने मलेशियाला ५-० च्या फरकाने हरवलं आहे. भारतीय फुटबॉल संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत आहे. कर्णधार सुनील छेत्रीचा खेळ देखील अप्रतिम सुरू आहे. त्याने चायनीज ताईपेइ विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅट्रिक नोंदवली होती. भारतीय फुटबॉल संघाचा सुधारलेला खेळ भारताचा एशिया कपवरील दावा अजूनच पक्का करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -