घरक्रीडाहॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताची अर्जेंटिनावर २-१ ने मात

हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताची अर्जेंटिनावर २-१ ने मात

Subscribe

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंह याने आज आपला ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याने आतापर्यंत ३०० सामन्यात १६ गोल केले आहेत

हॉकी जगतातील मानाची स्पर्धा मानली जाणारी ‘हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी’ ही स्पर्धा नेदरलँडच्या ब्रेडा शहरात सुरू आहे. भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर ४-० च्या फरकाने विजय मिळवल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही अर्जेंटिनाला धुळ चारत २-१ ने विजय मिळवला आहे. या स्पर्धेतला भारताचा हा सलग दुसरा विजय आहे.


सामन्याच्या सुरूवातीपासूनच अर्जेंटीना संघाने आक्रमक खेळ सुरू केला होता. तर दुसरीकडे भारताकडून बचावात्मक पवित्रा दिसून येत होता. त्यामुळे चुरशीच्या झालेल्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांना एकदेखील गोल करता आला नाही. मात्र दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीच्या १७ व्या मिनिटाला भारताच्या हरमनप्रीतसिंहने गोल केला आणि भारताला १-० ची आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताकडून गोलसाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. अखेर २८व्या मिनिटाला मनदीपने भारताकडून गोल करत सामन्यात २-० ची आघाडी घेतली. यांनतर लगेचच २९ व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या पेयाटने गोल करत सामन्यात बरोबरी साधन्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या अभेद्य बचावफळीपुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही. सामन्याच्या अखेरीस २-१ या स्कोरने भारतीय संघांने विजय मिळवला.

- Advertisement -
india hocky win
गोलनंतर आनंद व्यक्त करताना भारतीय खेळाडू

भारतीय कर्णधार सरदार सिंहची ट्रिपल सेंच्युरी

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंह याने आज आपला ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. २००६ मध्ये पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात सरदार सिंहने आंतरराष्ट्रीय हॉकीत पदार्पण केले होते. आतापर्यंत खेळलेल्या ३०० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने १६ गोल केले आहेत.

sardar singh
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंह

हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दोन सामने जिंकल्यानंतर आता भारतीय संघांचा पुढचा सामना २७ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारत आपली विजयाची हॅट्रीक पूर्ण करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -