घरक्रीडानिर्णायक सामन्यात भारताचा ५ गडी राखून इंग्लंडवर विजय; मालिकाही घातली खिशात

निर्णायक सामन्यात भारताचा ५ गडी राखून इंग्लंडवर विजय; मालिकाही घातली खिशात

Subscribe

भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात (ODI Match) भारताने दमदार विजय मिळवला आहे. इंग्लंडला ५ विकेट्सनी पराभव करत मालिकाही खिशात घातली.

भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात (ODI Match) भारताने दमदार विजय मिळवला आहे. इंग्लंडला ५ विकेट्सनी पराभव करत मालिकाही खिशात घातली. यष्टीरक्षक रिषभ पंतची शतकी खेळी आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) ७१ धावांच्या जोरावर भारताने इंग्लंडला पराभूत केले. (India won match against England by 5 wickets)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २५९ धावा केल्या होत्या. मात्र भारताने प्रत्युत्तरात हे लक्ष्य ५ गड्यांच्या मोबदल्यात ४२.१ षटकात पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक ६० धावा केल्या.

- Advertisement -

बटलरशिवाय जेसन रॉयने ४१ धावा, मोईन अलीनं ३४ धावा, क्रेग ओव्हरटनने ३२ धावा केल्या. शिवाय, बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी २७-२७ धावांचे योगदान दिले.

भारताकडून हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत ७ षटकात २४ धावा देत ४ विकेट्स घेतले. हार्दिकच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. त्यांच्याशिवाय युझवेंद्र चहलने तीन आणि मोहम्मद सिराजनं २ आणि रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.

- Advertisement -

३७ व्या षटकात हार्दिकने इंग्लंडला दोन धक्के दिले. त्याने लियाम लिव्हिंगस्टोन आणि बटलर यांच्यातील ४९ धावांची भागीदारी मोडली. पंड्याने लिव्हिंगस्टोनला रवींद्र जडेजाने बाऊंड्रीवर झेलबाद केले.

याशिवाय, हार्दिकने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बटलरला बाद केले. ८९ चेंडूत ६० धावा करून तो बाद झाला. जडेजाने बटलरचा अप्रतिम झेल घेतला. बटलरने आपल्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकार मारले.


हेही वाचा – IND vs ENG : अखेरच्या सामन्यात भारतीय संघात ‘हा’ मोठा बदल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -