Eco friendly bappa Competition
घर क्रीडा चक दे इंडिया; भारतीय हॉकी संघानं मलेशियाचा पराभव करत आशियाई विश्वचषकावर कोरलं...

चक दे इंडिया; भारतीय हॉकी संघानं मलेशियाचा पराभव करत आशियाई विश्वचषकावर कोरलं नाव

Subscribe

भारताने अवघ्या 11 मिनिटांत सामन्याला रंजक वळणं देत मलेशियाचा 4-3 असा पराभव करत चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडिअमवर हा अंतिम फेरीचा थरारक सामना पार पडला.  या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारताने अवघ्या 11 मिनिटांत सामन्याला रंजक वळणं देत मलेशियाचा 4-3 असा पराभव करत चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडिअमवर हा अंतिम फेरीचा थरारक सामना पार पडला.  या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.( India won the Asian Champions Trophy for the fourth time by defeating Malaysia 4-3 in just 11 minutes )

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं हा विजय मिळवला आहे. भारतीय संघानं सुरूवातीच्या हाफमध्ये 1-3 ने पिछाडीवर असताना मलेशियाचा 4-3 पराभव केला. चेन्नईमध्ये शनिवारी संध्याकाळी महापौर राधाकृष्णन स्टेडिअमवर झालेल्या रंजक सामन्यात भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं.

- Advertisement -

( हेही वाचा: जयस्वाल आणि गिलचा झंझावात; 9 विकेटने भारताचा विंडिजवर विजय, मालिकेत 2-2 ची बरोबरी )

भारताकडून जुगलराज सिंह ( 19 व्या मिनिटाला) हरमनप्रित सिंह ( 45 व्या मिनिटाला, गुरजंत सिंह ( 45 व्या मिनिटाला) आणि आकाशदीप सिंह ( 56 व्या मिनिटाला) यांनी गोल डागले. तर तिकडे मलेशियासाठी अजराई अबू कमाल, रजी रहीम आणि एम. अमीनुद्दीन यांनी गोल केले.

- Advertisement -

या अंतिम मुकाबल्यात गोलची सुरूवात भारताकडून झाली. खेळाच्या 9 व्या मिनिटाला जुगलराज सिंह यांनी पेनल्टी कॉर्नरवर एक उत्कृष्ट गोल केला. त्यानंतर खेळाच्या 14 व्या मिनिटाला अजराई अबू कमाल याने फील्ड गोल करत स्कोअर 1.1 असा बरोबरीत आणला. मग खेळाच्या दुसरा क्वार्टर पूर्णपणे मलेशियाच्या नावे झाला. यात पाहुण्या संघानं दोन गोल केले.

त्यानंतर 18 व्या मिनिटाला अनुभवी खेळाडू असलेल्या रजी रहीम याने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. विशेष म्हणजे हाफटाइपर्यंत मलेशिया 3-1 पुढे होता.

भारताचे शानदार पुनरागमन

त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघानं शानदार पुनरागमन केलं. या क्वार्टरमध्ये शेवटच्या मिनिटात भारतानं दोन गोल केले. सर्वप्रथम कर्णधार हरमनप्रीत सिहं याने पेनल्टी स्ट्रोकवर दमदार गोल केला. नंतर काही सेकंदातच गुजरंत सिंहने फील्ड गोल डागत मुकाबला बरोबरीत आणला. नंतर शेवटच्या क्वार्टरमध्ये आकाशदीप सिंह याने भारतासाठी निर्णायक गोल डागला.

भारताने ही स्पर्धा चौथ्यांदा जिंकत पाकिस्तानला मागं सारलं आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त केवळ कोरियाच ही स्पर्धा जिंकू शकला आहे.

- Advertisment -