राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकलेले खेळाडू भारतात येताच विमानतळावर जल्लोषात स्वागत

बर्मिंगहॅम झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळी करत प्रतिस्पर्धींना चांगलीच टक्कर दिली. भारताने 22 सुवर्णांसह 61 पदके जिंकली आहेत. त्यामुळे देशभरात त्यांचे कौतुक केले जात आहे. सोमवारी या राष्ट्रकुल स्पर्धेचा अखेरचा दिवस होता.

बर्मिंगहॅम झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळी करत प्रतिस्पर्धींना चांगलीच टक्कर दिली. भारताने 22 सुवर्णांसह 61 पदके जिंकली आहेत. त्यामुळे देशभरात त्यांचे कौतुक केले जात आहे. सोमवारी या राष्ट्रकुल स्पर्धेचा अखेरचा दिवस होता. त्यानंतर संपूर्ण भारतीय संघ मायदेशात परतला आहे. मायदेशात आल्यानंतर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. (indian athletes back at home commonwealth games 2022)

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने कुस्तीत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी 12 पदके जिंकली, ज्यात 6 सुवर्ण, 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये 10 पदके आली. तर बॉक्सिंगमध्येही भारताने तीन सुवर्णांसह 7 पदके जिंकली आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवलेले खेळाडू विमानतळावर आल्यावर चाहत्यांसह विमानतळावरील कर्मचाऱ्यांनीही टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचे स्वागत केले. सोमवारी समारोप समारंभात टेबल टेनिसपटू शरथ कमल आणि महिला बॉक्सर निखत झरीन हे भारतीय संघाचे ध्वजवाहक होते.

बर्मिंगहॅम येथून भारतीय संघ विमानतळावर दाखल झाल्याचा व्हिडिओ स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (SAI) शेअर केला आहे. सर्व खेळाडू वेगवेगळ्या विमानाने विमानतळावर दाखल झाले. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये खेळाडू आपल्या हातात मेडल घेऊन येताना दिसत आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 22 सुवर्णांसह 61 पदके जिंकली आहेत. यात 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचाही समावेश आहे. भारत राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिला. तसेच, राष्ट्रकुल स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सोमवारी भारताने 4 सुवर्णांसह एकूण 4 पदके जिंकली.

दरम्यान, पुढील राष्ट्रकुल स्पर्धा ही चार वर्षांनंतर होणार आहे. तसेच, ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे आयोजन केले जाणार आहे.


हेही वाचा – Asia Cup 2022साठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी