भारताला बॅडमिंटनमध्ये दुसरे सुवर्णपदक, लक्ष्य सेनची उत्कृष्ट कामगिरी

बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या बॅड मिनंटपटूंनी सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तर पी.व्ही. सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेननेदेखील उत्कृष्ट कामगिरी करत भारताला बॅडमिंटनमध्ये दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे.

मलेशियाचा त्झे योंग एनजी आणि भारताचा लक्ष्य सेन यांच्यादरम्यान पुरुष एकेरीचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात लक्ष्यने एनजीचा 21-19, 21-9, 21-16 अशा फरकाने पराभव केला. त्झे योंग एनजी याच्याविरूद्ध पहिल्या गेमच्या सुरूवातीला पिछाडीवर पडला होता. मात्र, त्याने गुणांमधील अंतर कमी करत आणले. तसेच लक्ष्यने 18-18 अशी बरोबरी देखील केली.

काल रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतील सामन्यात लक्ष्य सेनने जबरदस्त खेळ दाखवला होता. त्याने जागतिक क्रमवारीत 10व्या क्रमांकावर असलेल्या सिंगापूरच्या जिया हेंग तेह 21-10, 18-21, 21-16 असा पराभव केला होता.

सिंधूच्या विजयाने भारताने न्यूझीलंडला मागे टाकत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे. सिंगापूर आणि मलेशियन बॅडमिंटनपटूंना पराभूत करून सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे तिचे जिंकणे जवळपास निश्चित झाले होते. पहिल्या सेटमध्ये पीव्ही सिंधूनं 21-15 असा विजय मिळवत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. तर दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने मिशेल लीला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. दुसरा सेटही सिंधूने 21-13च्या फरकानं जिंकून तिने एकतर्फी विजय मिळवला आहे.


हेही वाचा : पी.व्ही. सिंधूने सुवर्णपदक जिंकले, भारताची पदकसंख्या 56 वर