के. एल. राहुलला कोरोनाची लागण; वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकणार?

इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर दाखल झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० आणि वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

KL Rahul shared emotional post after out of Africa series

इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर दाखल झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० आणि वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज के. एल. राहुलला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका राहुल खेळणार का, याबाबत साशंका आहे. (Indian batsman kl rahul tested positive for covid 19)

भारतीय संघात स्थान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून दौऱ्याला सुरूवात होणार आहे. के. एल. राहुल सध्या बेंगळरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर काम करत आहे. राहुलला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. मात्र फिटनेस चाचणीवर आधारीत होते. दरम्यान, राहुलचे नुकतेच जर्मनीत हर्नियाचे ऑपरेशन झाले. पोर्ट ऑफ स्पेन येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान केएल राहुलला दुखापत झाली होती. त्यानंतर ते उपचारासाठी जर्मनीला गेले. त्याच महिन्यात तो भारतात परतला. येथे आल्यावर राहुल नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) च्या पुनर्वसन प्रक्रियेतून गेला.

दरम्यान, कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला संघातील एक सदस्य देखील कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याची माहिती गांगुलीने दिली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.


हेही वाचा – अखेर ठिकाण ठरलं! आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ‘यूएई’मध्ये होणार