नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका सुरू असून आतापर्यंत 3 कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये 1 – 1 अशी बरोबरी केली असून पुढील 2 सामने महत्त्वाचे ठरणार आहेत. अशामध्ये सर्वांच्या नजरा या 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीकडे लागल्या आहेत. पण या कसोटीआधीच भारतीय संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. बुमराहने तिसऱ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करत 9 विकेट घेतले. त्यामुळे कसोटीच्या इतिहासात सर्वाधिक रेटिंग पॉइंट्स मिळवणारा पहिला भारतीय ठरला आहे. (Indian Bowler Jasprit Bumrah ICC Test Ranking)
हेही वाचा : P V Sindhu : कोण आहे पी. व्ही. सिंधूचा पती ?
आयसीसीने नुकतेच जारी केलेल्या क्रमवारीमध्ये, गाबामध्ये झालेल्या कसोटीत बुमराहने 9 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसोबतच क्रमवारीत त्याच्या नावावर 904 गुण जमा झाले आहेत. यासोबत त्याने भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 2016 मध्ये अश्विनच्या नावावर सर्वाधिक रेटिंगचा हा रेकॉर्ड झाला होता. आता सर्वाधिक रेटिंगचा हा रेकॉर्ड आर अश्विन आणि जसप्रीत बूमरहा यांच्या नावाने संयुक्तरित्या जमा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने आतापर्यंत 21 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान, या क्रमवारीत बूमरहा पाठोपाठ कसिगो रबाडा 856 गुणांसह दुसऱ्या स्थानी तर जोश हेजलवुड हा 852 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. तसेच, भारतीय गोलंदाज आणि नुकताच निवृत्त झालेला आर अश्विन हा 789 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तसेच, रवींद्र जडेजा हा 4 स्थान खाली येत 755 दहाव्या स्थानावर गेला आहे.
इंग्लंडच्या सिडनीत बर्न्सच्या नावावर जागतिक्र विक्रम आहे. 1914 वर्षी त्याने 932 पॉइंट्स मिळवले होते. तर दुसऱ्या क्रमाकांवर इंग्लंडचा जॉर्ज लोहमॅन 931 पॉइंट्स मिळवले होते. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान हा 922 पॉइंटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा मुथैया मुरलीधर 920 रेटिंग पॉइंट्ससह चौथ्या क्रमाकांवर आहे. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्ग्रा हा 914 पॉइंट्ससह 5 व्या क्रमांकावर आहे.