Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Boxing world championship : भारतीय बॉक्सर निशांत देव, संजीत उपांत्यपूर्व फेरीत

Boxing world championship : भारतीय बॉक्सर निशांत देव, संजीत उपांत्यपूर्व फेरीत

Subscribe

भारतीय बॉक्सर निशांत देव आणि संजीत यांनी शेवटच्या १६ टप्प्यातील लढतींमध्ये शानदार विजय मिळवून एआयबीएच्या पुरुष जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

भारतीय बॉक्सर निशांत देव आणि संजीतने यांनी शेवटच्या १६ टप्प्यातील लढतींमध्ये शानदार विजय मिळवून एआयबीएच्या पुरुष जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या या लक्षणीय लढतीत निशांत देवने (७१ किलो) वजनी गटाच्या सामन्यात मेक्सिकोच्या मार्को अल्वारेझ वर्देचा ३-२ अशा फरकाने पराभव करून रशियाच्या वादिम मुसाएवशीचा सामना केला. मागील सामन्यात उपांत्यपूर्व फेरीच्या संजीतने (९२ किलो) वजनी गटाक जॉर्जियाच्या जिओर्गी चिग्लॅड्झचा ४-१ असा पराभव करत सलग दुसऱ्यांदा अंतिम आठमध्ये प्रवेश मिळवला. तर त्याचा दुसरा सामना इटलीच्या अझीझ अब्बेस मुहिदीनशी होणार आहे.

सोमवारी रात्री रोहित मोर (57 किलो), आकाश सांगवान (67 किलो), सुमित (75 किलो) आणि पाच वेळा आशियाई पदक विजेता राहिलेला शिवा थापा (63.5 किलो) हे उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. रोहितचा सामना कझाकिस्तानच्या सेरिक तेमिरझानोव्हशी होणार आहे तर आकाशचा सामना क्युबाच्या केविन ब्राउनशी होणार आहे. सुमितचा सामना क्युबाच्या योएनलिस हर्नांडेझविरुद्ध होणार आहे.

- Advertisement -

पाच वेळा आशियाई पदक विजेता असलेल्या शिवा थापाची लढत फ्रान्सच्या लुनेस हमरौईशी होणार आहे. शोपीसमधील सुवर्ण विजेत्या खेळाडूला १ लाख रूपयांचे डॉलर्स बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. तर रौप्य पदक विजेत्यांना डॉसर्लच्या रकमेनुसार पन्नास हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर दोन्ही कांस्य पदक विजेत्यांना खेळाडूंना प्रत्येकी पंचवीस हजारचे बक्षीस डॉलर्सच्या स्वरूपात दिले जाणार आहे.


 

- Advertisement -
- Advertisement -
MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -