घरक्रीडाकोहली मानाच्या विस्डेन पुरस्काराने सन्मानित

कोहली मानाच्या विस्डेन पुरस्काराने सन्मानित

Subscribe

कोहलीने आतापर्यंत २५४ एकदिवसीय सामन्यांत १२,१६९ धावा केल्या आहेत.

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली असली तरी एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची कामगिरी सर्वात विशेष ठरली आहे. आता कोहलीला विस्डेनने २०१० च्या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू या पुरस्काराने सन्मानित केले आहे. विस्डेनला क्रिकेटचे बायबल म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे या पुरस्काराला विशेष मान आहे. ३२ वर्षीय कोहलीने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत २५४ एकदिवसीय सामन्यांत १२,१६९ धावा केल्या असून त्याची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते.

एकदिवसीय क्रिकेटला ५० वर्षे पूर्ण

एकदिवसीय क्रिकेटला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे विस्डेनने यंदाच्या पुस्तकाच्या आवृत्तीत १९७१ ते २०२१ या पाचही दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंची निवड केली. २०१० च्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची निवड झाली आहे, अशी माहिती विस्डेनने त्यांच्या वेबसाईटवर दिली.

- Advertisement -

दहा वर्षांत तब्बल ४२ शतके

२०१० च्या दशकात कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या दहा वर्षांच्या कालावधीत ११ हजारहून अधिक धावा केल्या. तसेच त्याने या काळात तब्बल ४२ शतके केली. २०११ वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. त्यामुळे विस्डेनने त्याला सन्मानित केले आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -