स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सचिन तेंडुलकरसह ‘या’ खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा

यंदा भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण झाली आणि याच निमित्त सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्ताने देशभरात ध्वजारोहण करण्यात आले. या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजकीय नेत्यांसह भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

यंदा भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण झाली आणि याच निमित्त सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्ताने देशभरात ध्वजारोहण करण्यात आले. या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजकीय नेत्यांसह भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनीही शुभेच्छा दिल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चांहत्यांना आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. “हमेशा रहा है मेरे दिल में तिरंगा, आज लेहराएगा मेरे घर पे तिरंगा”, असे सचिनने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

सचिनसह भारतीय संघाचा सलामीवर शिखर धवन, माजी कर्णधार विराट कोहली, वेगवांन गोलंदाज जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनप्रमाणे धवन यानेही व्हिडीओ शेअर करत चाहते आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. “स्वातंत्र्य दिन माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. देशाला स्वतंत्र करणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाचा मी आभारी आहे. त्यांच्यामुळेच आपला देश स्वतंत्र झाला आहे. यापुढेही देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाऊया. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.”, असे धवनने म्हटले.

“आमला ध्वज आमला अभिमान! उंच उडणारा तिरंगा हे, प्रत्येक भारतीयाचे हृदय आनंदाने भरून जाणारे दृश्य आहे. आज मी माझ्या घरी तिरंगा फडकावला”, असे मिताली राज यांनी म्हटले.

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा – हार्दिक पांड्या

सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद! – जसप्रीत बुमराह

75 वर्षे गौरवाची. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद! – विराट कोहली


हेही वाचा – फिट राहण्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम विराट कोहलीप्रमाणे करतोय ‘हे’ काम