घरक्रीडादक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी टीमची घोषणा; राहुल आऊट, गिल इन

दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी टीमची घोषणा; राहुल आऊट, गिल इन

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाने विडींजला घरच्या मैदानात पराभूत केल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेसोबत घरच्या मैदानावर तीन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेसोबत तीन कसोटी आणि तीन टी-ट्वेंटी सामने खेळले जाणार आहेत. आज बीसीसीआयने तीन कसोटी सामन्यांसाठी १५ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. विडींज दौऱ्यात सलामीवीर म्हणून खराब कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलला विश्रांती देण्यात आली असून त्याजागी भारतीय अ संघाकडून खेळणाऱ्या शुभमन गिलला संघात स्थान देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात २ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टनम येथे पहिला कसोटी सामना खेळला जाईल.

- Advertisement -

वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या संघापैकी फक्त लोकेश राहुलच्या रुपाने एकमात्र बदल करण्यात आलेला आहे. राहुल बाहेर गेल्यामुळे आता सलामीवीर म्हणून कोण येणार? असा प्रश्न निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांना विचारला गेला होता. त्यावर राहुलच्या जागी रोहित शर्मा ओपनिंग करु शकतो, असे वक्तव्य प्रसाद यांनी केले आहे. आता मयांक अग्रवाल सोबत रोहित शर्मा ओपनिंगला खेळताना दिसू शकतो.

तर भारतीय संघाच्या मधल्या फळीची जबाबदारी चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांच्यावर असेल. तसेच विकेट किपर रिषभ पंत आणि रिद्धिमान साहा यांच्यावर बॅटिंग आणि किपिंगची जबाबदारी असेल. तर भारतीय बॉलिंगची कमान रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदिप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मावर असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -